प्रेषित निघून जातात कालातीत विचारांचे ठसे ठेवत.
आम्ही मात्र काळाच्या पडद्यावर रक्तलांच्छित ठसे ठेवतो
ते सुळावर चढतात आमच्या कल्याणासाठी
त्यांच्या विचारांना आम्ही सुळी देतो स्वार्थासाठी
ते आपलाच क्रूस वागवतात खांद्यावर स्वतःच्याच
आम्ही जबाबदारीचे ओझेही पेलत नाही स्वतःच्याच
मृत्यूनंतरही ते पुन्हा प्रकटतात आमच्या भल्यासाठी
मारेकरी मात्र सतत जन्म घेतात क्रौर्यासाठी
एकदा क्रूरपणे त्यांना प्रत्यक्ष मारण्यासाठी,
मग अधिक क्रूरपणे विचारांना मारण्यासाठी
— रचना : सुनील देशपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800