Home बातम्या “प्रोत्साहनाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते” – राणी सोनवणे

“प्रोत्साहनाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते” – राणी सोनवणे

0

“विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन मिळाले तर निश्चितपणे त्यांची गुणवत्ता वाढते आणि शाळेचा शैक्षणिक आलेखही उंचावतो” असे प्रतिपादन श्रीरामपूर विभागाच्या उपप्रादेशिक अधिकारी, राणी सोनवणे यांनी केले. श्रीरामपुर येथील जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल माळेवाडी शाळेत या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या वेगवेगळ्या स्पर्धा मधील यशाबद्दल शाळेत त्यांचा सन्मान सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी सोनवणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि रस्त्यावर चालताना घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन करून, या विद्यार्थ्यांनी स्वतः तर सर्व नियमांचे पालन केलेच पाहिजे पण असे या नियमांचे पालन आई वडिलांनी देखील केले पाहिजे, यासाठी त्यांच्याकडे आग्रह करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी शाळेत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला संस्कार स्पर्धा परीक्षा मुंबई, तसेच साई कलाविष्कार संस्था, पुणे यांच्या चित्र रंग भरण परीक्षेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभ इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा, जिल्हास्तरावर निवड झालेल्या आणि तालुका स्तरावर प्रथम आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेतील बाल कलाकारांचाही गुणगौरव करण्यात आला.

केंद्रस्तरीय लांब उडी, उंच उडी, धावणे, कथाकथन आणि वकृत्वस्पर्धेत केंद्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक भागचंद औताडे, श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पोलीस नाईक किरण टेकाळे, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, सरपंच सोपानराव औताडे, उपसरपंच भागुबाई मगन घोडके, आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी पवन आत्राम, असिस्टंट मॅनेजर मिथिलेश कुमार, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष भाऊसाहेब ठाकरे, एकनाथ ठाकरे, सराल्याचे सरपंच शंकर विटेकर, किरण बनसोडे, बबन तात्या औताडे, रवींद्र मोहन, प्रकाश मोहन, आशाबाई फुलारे,त्तायर शेख, रामभाऊ वमने, देविदास वमने, वैभव नेद्रे, गणेश लबडे, विजय मोहन, अविनाश उमाप, अंकुश मोहन, सोनल औताडे, मनोज घोडके, सचिन वमने, विलास औताडे, राहुल औताडे, जाकीर शहा, कालिंदी घोडके, रूपाली घोडके, रेश्मा शेख, शीतल ठाकरे, आसाराम लबडे सुवर्ण वमने, सुनीता ठाकरे, शांता मोहन आदी शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक उपक्रमशील शिक्षक रज्जाक शेख यांनी केले. आभार मुख्याध्यापक राजू भालेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सारिका लोखंडे, मीरा ससाने, मीनाक्षी जाधव यांनी परिश्रम घेतले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version