विश्वात असंख्य आकाशगंगा असून त्यात अब्जावधी ग्रह आहेत. पण ‘फक्त एक पृथ्वी’ सजीव आहे. म्हणून याच अनुषंगाने ‘ओन्ली वन अर्थ’ या थीमवर यंदाचा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे.
पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने हे वर्ष महत्वाचे आहे. कारण 1972 च्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण परिषदेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वस्थ, निरोगी आणि प्रदुषणमुक्त आयुष्य जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे आहे. आणि म्हणूनचं जागतिक स्तरावर पर्यावरण दिवस साजरा करून पर्यावरण संरक्षणाविषयी प्रबोधन केले जाते.
या वर्षीची जागतिक पर्यावरण दिवसाची थीम ही ‘ओन्ली वन अर्थ‘ म्हणजे केवळ एक पृथ्वी आहे ही आहे. आपण सर्वानी मिळुन ह्या पृथ्वीवरील पर्यावरणाचे संतुलन राखायला हवे आणि आपली पृथ्वी आणि जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी, आपल्या आजुबाजुचे पर्यावरण सुरक्षित ठेवायला हवे हे अधोरेखित करण्यासाठी यंदा ही थीम ठेवण्यात आली आहे.
पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर सातत्याने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
यासाठी पुढील उपाययोजना करता येणे प्रत्येकाला शक्य आहे.
● आपल्या परिसरात जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करणे.
● उघडयावर कचरा न फेकता तो कचरापेटीत टाकणे.
● आपल्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवणे.
● इंधन बचतीस महत्व देणे.
● इतरांना देखील पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी प्रेरित करणे.
● पॉलिथिन किंवा प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालणे.
या पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने पर्यावरण संरक्षणाला महत्व देऊन जागतिक स्तरावर सुरु असलेल्या उपक्रमांत आपणही आपला खारीचा वाटा देऊन सहभागी व्हावे आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे आपले कर्तव्यच आहे.

– लेखन : प्रज्ञा पंडित. ठाणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800
लेख आवडला…. प्रत्येकाने पर्यावरण विषयाचा गंभीरपणे विचार करायला हवा…. प्लॅस्टिक बंदी काही दिवसांपुरती होते…..नंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न….या विषयावर गंभीरपणे विचार व्हायला हवा.
प्रज्ञा पंडीत यांचा लेख लहान असूनही पर्यावरणाविषयी संपूर्ण माहिती देणारा आहे
पर्यावरणाच्या संवर्धनाची आज नितांत गरज आहे.प्रस्तुत लेखातून त्याचा सुरेख आढावा घेतला आहे.
खुप सुंदर लेख .किती साध्याशा शब्दात पर्यावरणाचे महत्व सहज पटवून दिले आहे .ओन्ली वन अर्थ अगदीं खरे आहे .धन्यवाद प्रज्ञाताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरचं आजच्या काळात याची गरज आहे.