प्रिय अलका,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
उगवला दिवस आज तुझ्यासाठी,
औक्षण करावे डोळे भरून,
दृष्ट काढावी गालबोट लावून,
करू प्रार्थना उदंड आयुष्यासाठी ॥
गोल मुखडा चंद्रा परि,
गळी कंठ कोकिळ गाणी,
नयनी लक्ष्य तीर परि,
अखंड उत्साह सागरा वाणी ॥
अवखळ नटखट तुझ्यात खुलते,
हसण्यात तुझ्या गुलाब फुलते,
वाणीत तुझ्या सहजता भिडते,
वर्णनात तुझ्या शब्दच विसरते ॥
सर्वांसाठी वाहता प्रेमाचा झरा,
गरजूंना तुझा आधार मोठा,
प्रसंगी लढवय्या मैदानी प्रहार,
समाजसेवी कामी वाटा मोठा ॥

– रचना : सौ. वर्षा भाबल.
सौ.भाबल यांनी कवितेतून अलकाताई यांना दिलेल्या शुभेच्छा भावनांना दिलेली चांगली अभिव्यक्ति आणि उत्तम रचनेची साक्ष आहे.
🌹खूप सहजतेने आपण ताईंबद्दल वर्णन केले.
जे आपण लिहिले त्यासाठी ताईंनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना येते 🌹
धन्यवाद,
सौं. वर्षा भाबल
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ