Tuesday, September 16, 2025
Homeबातम्याफार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी दिशा

फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी दिशा

आजच्या डिजिटल युगात फार्मसी क्षेत्राचा विस्तार फक्त मेडिकलचे दुकान किंवा औषधांच्या उत्पादनापुरताच मर्यादित राहिला नसून दिवसेंदिवस या क्षेत्रात करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत.

आता फार्मसी पदवीधारकांसाठी आय टी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. डेटा अनालिसिस, मेडिकल रिपोर्टिंग, मेडिकल कोडिंग, क्लिनिकल डाटा मॅनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड सिस्टम, फॉर्मुलेशन सॉफ्टवेअर, संशोधन आणि विकास सोल्युशन्समध्ये फार्मासिस्टची गरज वाढली आहे. अनेक आयटी कंपन्या हेल्थकेअर आणि फार्मास्युटिकल डेटा सिस्टीमवर काम करतात ज्यासाठी त्यांना औषधज्ञान असलेले उमेदवार आवश्‍यक असतात.

फार्मसी विद्यार्थ्यांना जर आय टी क्षेत्रातील SQL, Excel, Healthcare software, Pharma covigilance tools, Python basics अशी मूलभूत जाण असेल तर ते Clinical Data Analyst, Pharama covigilance Associate, Drug Safety Officer, Medical Writer अशा पदांसाठी निवडले जाऊ शकतात. आज अनेक फार्मसी पदवीधर डेटा सायन्स किंवा हेल्थ इन्फॉर्मेटिक्स कोर्स करून आय टी क्षेत्रात उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळवत आहेत. या क्षेत्रात कामाचा ताण तुलनेने कमी असून संशोधन कार्यात कामाच्या निश्चित वेळा असतात हीसुद्धा एक जमेची बाब आहे.

नुतन कॉलेज ऑफ फार्मसी कवठेमहांकाळ मध्ये विद्यार्थ्यांना या नव्या करिअर संधीची माहिती देण्यासाठी विशेष मार्गदर्शन सेशन्स, वेबिनार आणि स्किल-बेस्ड वर्कशॉप्स घेतले जात आहेत. आयटी क्षेत्रातील फार्मासिस्टची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे म्हणूनच फार्मसी विद्यार्थी केवळ परंपरागत नोकरीपेक्षा या नव्या डिजिटल हेल्थकेअर क्षेत्रात सामील होण्याचा विचार करू शकतात. ही दिशा नक्कीच त्यांना जागतिक पातळीवर संधी देणारी ठरू शकते.

— लेखन : प्रा मनोहर केंगार.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. प्रा केंगार यांनी आपल्या लेखात करियर विषयी उत्तम माहिती दिली आहे. फार्मसी विद्यार्थ्यांना याचा नक्की फायदा होईल.
    धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments