मी हाय फौंजीची आई
शिवबाची जिजाऊ माई
पोर जवा त्या सीमेवरती जाई
वीज माझ्या काळजातून जाई ….
देश सेवा या रक्तातून वाही
लहानाचा मोठा मी त्याला केला
करल सांभाळ माझ्या म्हातारपणाला….
दिसलं पाय त्याचं पाळण्यात मला
करेल सलाम या भारतमातेला
डोळं त्यागानं पानावून जाई….
वीज माझ्या काळजातून जाई ….!!
देश सेवा या रक्तातून वाही………!!
फौंजी देशाचा हाय तो मुखडा
निधड्या, आईच्या हातचा तोडा…..
घातला अकाळी शत्रूनं वेढा
पडला काळजाचा माझ्या तुकडा
फाटली धरती तो जख्मी होई…
वीज माझ्या काळजातून जाई ….!!!
देश सेवा या रक्तातून वाही………!!!
हिरं मोती ते फिकं सारं
पोटाला माझ्या सैनिक पोर
साता जन्माचं झालं उद्धार…
साऱ्या दिलात तो हाय अमर ….
आस मायेची वाट पाही
वीज माझ्या काळजातून जाई ..!!!!.
देश सेवा या रक्तातून वाही………!!!
मी हाय फौंजीची आई
शिवबाची जिजाऊ माई
पोर जवा त्या सीमेवरती जाई
वीज माझ्या काळजातून जाई ….
देश सेवा या रक्तातून वाही….

– रचना : सर्जेराव पाटील. ऑस्ट्रेलिया
(कौलवकर – नाशिककर)
छान