Sunday, September 8, 2024
Homeबातम्याबंद एनटीसी गिरण्या : आ.सचिन अहिर यांचा पुढाकार

बंद एनटीसी गिरण्या : आ.सचिन अहिर यांचा पुढाकार

बंद एनटीसी गिरण्या आणि गिरण्यांच्या चाळींच्या जागेवरील घरांच्या प्रश्नावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या सचिव रचना शहा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी दिल्ली वस्त्रोद्योग महामंडळाचे संचालक आशुतोष गुप्ता आणि वस्त्रोद्योग सचिवही उपस्थित होते.

मुंबई, महाराष्ट्रास देशभराती एनटीसीच्या २३ गिरण्या गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून बंद असून कामगारांच्या उपासमारीला अंत उरलेला नाही, असे सचिनभाऊ अहिर यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग महामंडळच्या गिरण्यांबाबत नॉनसेस गिरण्या सेस मध्ये बदलण्यात आलेल्या आहेत आणि महाराष्ट्र सरकारने चाळींच्या बाकी असलेल्या सेसची रक्कम एनटीसीने भरावी, असे बैठकीत सूचित करण्यात आले आहे‌. सचिनभाऊ अहिर यांच्या प्रश्नावर वाणिज्य मंत्रालय यांनी सांगितले, सदरबाब ही केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या अधीन आहे, ती लवकरच सोडविण्यात येईल. तसेच येणाऱ्या काळात केंद्र सरकारचे सचिव आणि महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाचे सचिव यांची एक बैठक प्रस्तावित आहे. या बैठकीत वस्त्रोद्योग महामंडळाच्या गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्वसना संदर्भात चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असेही सांगण्यात आले. आमदारांच्या या भेटीने दोन्ही प्रश्नांना चालना मिळाली आहे, असे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे.

— लेखन : गुरुदत्त वाकदेकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments