बदलला ऋतू, हवा बदलली,
पाऊस परतला, जरा थंडी आली,
उत्साह वाढेल, सण उत्सवांचा,
वाढता आनंद, हा ऋतू बदलांचा,
बळ वाढेल अंगी, उत्तम खाणे हवे,
नव्या या सणांना, नवीन गाणे हवे,
उत्तम आहे हवा, धूळ कमी झाली,
जथा वाढला, सकाळी फिरणाऱ्यांचा,
नवरात्र सुरू आहे, येईल पुढे दसरा,
रावण दहन होईल, विजयदिन साजरा,
येईल दीपावली, प्रकाश चोहीकडे,
घालवा अंधार, शूद्र विचारांचा..!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
ऋतू बदल हा आनंदाचा भाग असल्याची सकारात्मक भूमिका
भावली