बये तुला समजणं
सोपं नसेलही
पण कठीणही नाहीए
अंतरात्म्याला घालेल जो साद
अंतरातून देईल जो हाक
निरपक्षतेनं समजून घेईल सापेक्षभावानं
असा कोणीतरी असेलच..
इतकं निष्प्रेम नाहीए जग
इतकं अनुदार, इतकं भोगीही
विपरीततेतही रुजत असतो स्नेह
ओसाडातही अंकुरतं बीज
जे टिकतं, फुलतं, फुलवतं
पाहावी लागते थोडी वाट
शोधायची असते अनवट वाट
वहिवाट होऊ न देता….

– रचना : उमा नाबर. मुंबई.
ऊमा नाबर यांची बये ही कविता खूपच सकारात्मक.
विपरतेतही रुजतो स्नेह
शोधायची असते अनवट वाट
वहिवाट होऊ न देता..
सुंदर विचार.