काय तो पाऊस
तो वारा
येतो अंगावर
शहारा
गडगणारे ढग कडकडणारी वीज
खुणवती पावसात मनसोक्त भीज
मोराचा नाच
कोकिळीचे गान
क्षणात घालवतो
मनातील ताण
ते धुके
तो अंधार
निसर्ग करतो
सुंदर शृंगार
अखंड वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे
अडोशाला लपलेले पक्षांचे थवे
ऊन पावसाचा
हा लपंडाव
ओळख माझ्या
मनातील भाव
अदृश्य सोनेरी
सूर्याची किरणे
मनोसक्त बाहेर
सखी सोबत फिरणे
अंधारलेली ती
काळोखी वाट
नटलेला तो
गडद घाट
गाडीत लागलेली
प्रेमाची गाणी
सोबतीला ती
माझी प्रिय राणी
ती थंडी
तो गरमागरम चहा
थरथरनारा तो तिचा
हात पहा
चल सखे
पावसाच्या गावा
तिथे केवळ
माझ्यासोबत तू रहा
पावसाने केली
ही जादुई किमया
तिच्या विना
आता करमेना
पावसा तु पड
आता रे खूप
बहरून आले
तिचे ते रूप
बहरून आले
तिचे ते रूप
बहरून आले
तिचे ते रूप.

– रचना : रश्मी हेडे. सातारा.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
निसर्ग सौंदर्याने सजलेली सृष्टी आणि कवीचे आंतरिक भावविश्व यामधील सुसंवादाचा सुंदर आविष्कार!
✍🏼👍🏻👍🏻