नमस्कार, मंडळी.
डिसेंबर महिना आला की कोणाला काही तरी खास द्यावे. समाजासाठी आपण काही देणे लागतो, त्या दृष्टीने आपण काही तरी करावे.
अर्थात हा असा काही नियम नाही. कुठलीही जबरदस्ती तर मुळीच नाही. परंतु न मागता जर आपण समोरच्याला काही गरजेची वस्तू दिली तर घेणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद हा अनमोल असतो !!
आशय सोशल गृप चे डिसेंबर महिन्यातील देण्याचे हे दिवस आलेत ! “डिसेंबर गिविंग” चे हे पाचवे वर्ष. त्यामुळे या वर्षी काही तरी थोडे वेगळे करावे असे ठरवले.
तर या वर्षीची गोष्ट ही अशी असणार आहे….
गाव आहे – घाटणे,
तालुका – मोहोळ
जिल्हा – सोलापूर,
राज्य – महाराष्ट्र.
तर यावर्षी हे गाव आपण सॅनिटरी पॅड च्या विळख्यातून मुक्त करणार आहोत. एकदा वापरून फेकून दिले जाणारे सॅनिटरी पॅड, जे प्लास्टिक ने बनलेले असतात, हे रक्ताने माखलेले वापरून फेकलेले पॅड, आपल्या एकुलत्या एक धरती मातेला प्रदूषित करीत असतात. तसेच हे आरोग्यासाठी ही खूप हानिकारक आहे.
या सगळ्यातून वाचण्यासाठी, जर आपण आरोग्यदायी, पर्यावरण पूरक असे शाश्वत पर्याय घेऊन जर पुढील वाटचाल सुरू केली तर येणाऱ्या पिढीसाठी आपण एक छान सुंदर असे पर्यावरण नक्कीच देऊ शकतो !
या साठी आपण काय व कशी मदत करू शकतो ?
सांगते….
घाटणे गावातील, सगळ्या, हो जवळपास २५० हून अधिक मुली व महिला, ज्या मासिक पाळीच्या चक्रातून जात आहेत, त्या सगळ्यांसाठी आपण कापडी पॅड ची सोय करणार आहोत.
प्रत्येकीला साधारण ४ तरी कापडी पॅड देण्याचा आपला मानस आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा ४ कापडी पॅडचा एक सेट, ३ ते ४ वर्षे आरामात वापरता येईल.
जसे आपण रोज आपले वापरलेले कपडे स्वछ धुवून, नीट उन्हात वाळवून पुन्हा वापरतो, त्याच पद्धतीने या कापडी पॅडसची काळजी घेऊन आपण आपले आरोग्य सांभाळू शकतो.
त्यानंतर त्यांची विल्हेवाट कशी लावावी ? हा प्रश्न मनात असेल तर, या जुन्या कापडी पॅडला आपण जमिनीत पुरू शकतो किंवा याला जाळले तरीही चालते. शेवटी कपडा आणि राख ही जमिनीत विघटितच होणार !
कापडी पॅड सारखा शाश्वत पर्याय, घाटणे गावातील सर्व महिलांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण देणगी रुपात मदत करू शकता.
छोटीशी का असेना पण आपली ही मदत एक मोठे चांगले नवीन उदाहरण निर्माण करायला मदत करेल हे नक्की !
आपली देणगी देण्यासाठी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.
Ashay Social Group
8577101008761
CNRB0008577
Canara Bank,
Sakri Road,
Dhule.
UPI: 9421571219@upi
www.ashaysocialgroup.org
संपर्क क्र: 9930025807, 9421571219
आपल्या आजवरच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद !

– लेखन : सीमा खंडाळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800