‘बॉम्बे हाय’चे कामगार
हाय खाऊन मेले नाहीत
जीवन झुंज ही रोजचीच
हार त्यांना ठाऊक नाही
त्यांनी खाल्या गटांगळ्या
मारले सुर खोल खोल
तुटली बोटे, केले सहन
केल्या प्रार्थना मनोमन
जागृत राहून
केली प्रतिक्षा.
धीर राखला
ओलांडून भय कक्षा.
त्यांचा होता विश्वास
आपल्या देशावर
आणि व्यवस्थेवर
अखेर आले नौदलदूत
घेतले त्यांना धरेवर
आज या वादळाने
आणले त्यांना’ प्रकाशात
सारे थोडे शमले की
निघतील पुन्हा सागरात
दर्यावर्दी सैनिकच हे
काळे सोने आणणारे
सामान्यांच्या नजरेतून
दुर्लक्षित राहणारे
आणि जे ‘धारातीर्थी‘ पडले
त्यांना वाहुया श्रद्धांजली
वाहून आणतात इंधन
देशाच्या चलनवलनासाठी !

रचना : मेघना साने.
कितीही संकटं आली तरीदेखील घाबरून न जाता आत्मविश्वास आणि आत्मबलाच्या जोरावर त्या संकटावर स्वार होऊन त्याला नेस्तनाबूत करा असा अतिशय सकारात्मक दृष्टिकोन बॉम्बे हाय च्या कामगारांनी दिला आहे. आज आलेली परिस्थिती उद्या रहाणार नाही …ती निश्चितच बदलेल आणि उद्या पुन्हा नव्या जोमाने आणि उमेदीने आपल्या देशासाठी हे कामगार समुद्रात उतरतील असा आशावाद समुद्रातील वादळी संकटाशी दिलेली झुंज देणाऱ्या या झुंजार कामगारांबद्दल मेघना साने यांनी व्यक्त केला आहे. ही शौर्य कथा आपल्या कवितेतून मेघनाताईंनी अतिशय समर्पकपणे मांडली आहे.
व्वा..
मेघनाता, बॉम्बे हाय च्या कामगारांनी समुद्रातील वादळी संकटाशी दिलेली झुंज विशद करणारी अतिशय समर्पक कविता