बातमीदारी करताना…च्या या पूर्वीच्या दोन भागात आचार्य विनोबा भावे यांच्या महानिर्वाणाची पहिली बातमी मी कशी दिली होती, याविषयी मी व त्यानंतर माझे मित्र प्रवीण बर्दापूरकर यांनी लिहिले होते; दोन्ही भागातल्या मजकुराला खूप प्रतिसाद मिळाला.
युद्धस्य कथा रम्या म्हणतात तसंच बातमीदारांचे अनुभवांबद्दल लोकांना कुतूहल असते हे माहित होतेच. पण केवळ युद्ध, गुन्हेगारी, राजकारण, नाट्य, आणि सिनेमा क्षेत्रातील घडामोडी या विषयीच वाचतांना वाचकांना खूप स्वारस्य असते अशी माझी देखील कल्पना होती. वृत्तसंस्थेतील महानिर्वाण सारख्या बातमीमध्ये कोणाला स्वारस्य असू शकेल याविषयी काहीच अंदाज नव्हता, तो या निमित्ताने अनुभव घेतला.
काही गोष्टी या आधीच्या लेखाच्या अनुषंगाने सांगितल्या पाहिजेत त्या म्हणजे सुरेशचंद्र पाध्ये आणि अरविंद व्यं गोखले यासारख्या खूप ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या. वृत्तसंस्थातील कामाचे स्वरूप याची कोणालाही कल्पना नसते, त्यामुळे मुद्दाम तुझे अनुभव लिही असे या दोघांनी सांगितलं होते, हे मात्र खरं.
वाचकांना वर्तमानपत्राचा संपादक आणि बातमीदार यांची माहिती थोडी बहुत तरी असते. त्यांचे लिखाण आवडले आणि किंवा आवडले नाही असे होऊ शकते. परंतु मुळामध्ये युनायटेड न्यूज ऑफ इंडिया हे काय असते याची कल्पना नसते. थोड्या जाणकार लोकांना पीटीआय (प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया) ही एक वृत्तसंस्था आहे अशी थोडीफार माहिती असते.
माझ्या बाबतीत तर हे असंख्य वेळा घडले आहे. तुम्हाला पगार मिळतो का ? किती मिळतो ? तुम्हाला बातमी कोण देतो ? तुम्ही बातमी कशा मिळवता ? असे प्रश्न अगदी जवळचे नातेवाईक देखील आत्ता आत्तापर्यंत मला विचारत असत.
यु एन आय सारख्या वृत्तसंस्था मध्ये देखील कामाचे एक थ्रील असते. ते थ्रील जगत जगत आम्ही काम करत असतो या गोष्टी खूप लोकांना या लेखामुळे कळल्या. अगदी माध्यम क्षेत्रातल्या जाणकारांनी सुद्धा ‘हे आम्हाला माहीत नव्हतं’ असं प्रामाणिक पणे लिहून कळवलं. वृत्तपत्रविद्या विभागांमध्ये मी शिकवलं देखील आहे, त्यामुळे हे अनुभव संग्रहित करून पुस्तक प्रकाशित कर असा सल्लादेखील काहींनी दिला. पुढे काय, कसं घडेल हे माहिती नाही. परंतु या प्रतिक्रियांनी मनापासून आनंद वाटला हे नमूद करणे आवश्यक आहे.
काही निवडक प्रतिक्रिया सांगाव्याशा वाटतात, त्या पुढे देत आहे…….
खपला का रे म्हातारा ? Is great, typical बाबासाहेब style :
– डॉ मिलिंद कोकजे यांची. ते पी टी आय मध्ये होते .
सर, किती संयमित आणि धैर्याने तुम्ही काम करीत होता याचे हे उत्तम उदाहरण आहे. मला पत्रकारितेत तुमच्या बरोबर काम करायला नाही मिळाले याची खंत राहील, पण अनेक दिग्गज मित्राकडून आणि जेष्ठ सहकारी यांचे कडून खूप शिकायला मिळाले. वाचून खूप आनंद वाटला सर.
–एम पी जोशी, बदलापूर
बातमीदारी करू पाहणाऱ्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आठवण सर तुम्ही शब्दबद्ध केली आहे. मोठ्या व्यक्तीच्या निधनाची बातमी देताना काय काळजी घेतली पाहिजे, हेही तुम्ही सोदाहरण सांगितले. हे अलीकडच्या ब्रेकिंग न्यूजच्या काळात नक्कीच उद्बोधक ठरेल. तुमचे बातमीदारीचे असे अनेक अनुभव, किस्से लिखित स्वरुपात अर्थात पुस्तकाच्या माध्यमातून येत्या काळात वाचायला मिळतील, ही अपेक्षा…
– दुर्गेश सोनार, साम टीवी .. मुंबई
वा, प्रसंगाचे अतिशय नेमके आणि यथार्थ वर्णन.
– नाट्यकर्मी सतीश आळेकर
Loved the clarity, the crisp writing. UNI is in your blood!
-Mahesh Vijapurkar
सेवानिवृत्त डेप्युटी एडिटर, द हिंदू , मुंबई
सगळे लेख खूपच छान. माहिती मिळते. असेच पाठवत जा. उशीर होईल वाचायला. पण नक्की वाचणार आहे.
– अनुराधा चितळे, पुणे
खुप छान, सर. पत्रकारांसाठी ही केस स्टडीच आहे .
-डॉ राजेंद्र गोडे, सिंबायोसिस, पुणे
व्वा..अभिमान वाटावा, बाळगावा अशीच बातमीदारी ..शिवाय, म्हातारा खपला काय ?…इंदिराजींचे अश्रू वगैरे एकदम परखड भूमिका…आता ही जवळ जवळ लयास गेल्यात जमा आहे.
– नितीन सप्रे, दूरदर्शन, दिल्ली.
वा, छान, उद्बोधक
– मनोज क्षीरसागर, आकाशवाणी, पुणे
– व्वा खूपच छान.
– विनायक पटवर्धन, पुणे
नेहमीप्रमाणेच सुंदर,
– रत्ना परब, पुणे
Congratulations for scoop. Interesting to read how you released the news.
Keep sending.
– Vijay Naik, Delhi
सुंदर अनुभव :
– माया मुळे, औरंगाबाद.
बातमीदारी 39 वर्षे मागे घेऊन गेली ! मुख्यमंत्री भोसले जे बोलले ते अनेक लोक इतरही नेत्यांबद्दल बोलतात मात्र या पदावर असलेल्या व्यक्तीने असे बोलणे उचित नाही. असो. आपण पत्रकार म्हणून ते मांडलं हीच खरी बातमीदारी होय. आपल्या कामाशी एकनिष्ठ राहणे हीच खरी सर्व्हिस होय. संजय गांधींच्या अपघाती मृत्यू नंतर इंदिरा गांधींच्या डोळ्यात अश्रू दिसत असल्याचा एक फोटो “इंडिया टूडे” मधला माझ्याकडे आहे. तो आजही सापडला नाही. तो मी आपणाकडे पाठवणार होतो, त्यामुळेच प्रतिक्रियेस उशीर झाला. संजय गांधी तसेच इंदिरा गांधी यांच्या मृत्यूवेळी मी दिल्लीत होतो.
– अमर पांडे, सांगली .
या सर्व प्रतिक्रिया माझ्या पुढील लिखाणाला निश्चितच प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यामुळे मी या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800