आज पर्यंत आपल्या पोर्टलवर मोठ मोठ्या कवी, कवयित्री यांच्या कविता प्रसिध्द होत आल्या आहेत.
आज मात्र आपण बाल कवयित्री प्रज्ञा सुनील अंदुरे
हिचे स्वागत करू या….
विशेष म्हणजे आई वर हजारो कविता लिहिल्या गेल्या आहेत. त्या योग्यच आहेत. पण प्रज्ञा ने मात्र वडिलांवर कविता करून आपल्या वेगळे पणाची चुणूक दाखवून दिली आहे.
प्रज्ञा च्या भावी वाटचालसाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
सगळे म्हणतात
आईची ती वेडी माया,
आठवा जरा त्या बापाला
जो धरतो घरावर
प्रेमाची छाया.
तो बापच असतो जो आपल्याला घडवतो
तो बापच असतो जो आपल्याला वाढवतो.
रविवारच्या सुट्टीत
जो बागेत नेतो तो बाप
लेकरांचा आनंद पहाण्यासाठी
जो तळमळतो तो बाप
जरी वरून बापाला राग आला
तरी अंतरी त्यांच्या वाहतो प्रेमाचा झरा
त्या प्रेमाच्या झऱ्याला आठवा
राग निवळल्यावर
जवळ घेतो की नाही ते पहा
जन्मलेल्या त्या जीवाचा
पहिला शिक्षक असतो बाप
वरून थोडा कडक
आत कोमल कापसासारखा
असतो तो बाप
संकटाच्या वेळी
जो धीर देतो तो बाप
आनंदाच्या वेळी
आनंद देणारा तो बाप.

– रचना : कु.प्रज्ञा सुनिल अंदुरे. उमापुर जि.बीड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Very nice.
🌹खूप सुंदर कविता 🌹
बाल कवत्री अभिनंदन