Saturday, March 15, 2025
Homeकला'बाप्पा'ची कार्यशाळा

‘बाप्पा’ची कार्यशाळा

काय रे, किती मातीत खेळतोस ? हात पाय सगळे चिखल्याने बरबटलेले हात पाय धू, नाही तर इन्फेक्शन होईल, फोड येतील, बघ आवर पटकन…… हे वाक्य आपण सगळ्यांच्या तोंडी ऐकतो आणि लहान मुले असतील तर नक्कीच …….
पालकही यात काही चुकत नाही कारण सध्या माती हे पाहणं मुलांना माहीतच नाही व त्यातून मातीत खेळणं आलंच कुठे ? आणि जरी असली तरी त्याच्यात नको एवढं प्रदूषण झालेली म्हणजे ती माती आहे की प्रदूषित कचरा आहे हेही ओळखणे कठीण झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण मुलांना अनेक वेळा म्हणतो की मातीशी नाळ जुळली पाहिजे किंवा तेवढेच काय आता ही आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी सांगितलेले आहे, “आपली माती आपला देश” मग आता ही माती म्हटलं तेव्हा त्यांनी एवढंही सांगितलं आहे की माती हातात घेऊन शपथ घ्यायची आहे. आता ही पंचप्राण शपथ आहे, ही माती हातात घेऊन घ्यायला माती तर पाहिजे ना शिल्लक! हे झाले शहरातलं.

खेड्याविषयी मी काही फारच बोलणारच नाही. परंतु हे सगळं करताना एक असं लक्षात येते की आपल्याकडे अनेक पर्यावरण विषयी जागृती निर्माण करणारे तसेच पर्यावरण टिकवण्यासाठी अनेक लोक अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेऊन काम करतात आणि ह्या संस्था अनेक पर्यावरण पूरक असे उपक्रमही राबवतात मग ते अगदी शाळांपासून कॉलेजेस पर्यंतही ते राबवतात आणि म्हणूनच आम्ही आमच्या शाळेमध्ये कुठे तरी या मुलांना त्या मातीचा मुलायम स्पर्श व्हावा म्हणून बाप्पा बनवण्याचा घाट घातला आणि यासाठी काही निवडक मुलांना आम्ही संधी उपलब्ध करून दिली. हा उपक्रम नुकताच नूतन ज्ञान मंदिर कल्याण, पूर्व येथे पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवली आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी राबवला.

यावेळी पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले आणि आदित्य कदम उपस्थित होते. त्यांनी अगदी शाडू माती छान मऊसर मळून आणली होती आणि ती माती तिच्याविषयीचं प्रेम सगळं काही मुलांना व्यवस्थित समजावून सांगितलं आणि त्या मुलांच्या हातामध्ये मातीचे गोळे दिले तर गोळे दिल्यानंतर मातीचा तो थंडगार मऊ शार असा स्पर्श काही मुलांना सहन झाला नाही तर काही मुलांना अगदी छान वाटला आणि त्याच्यातूनच त्यांनी बाप्पा साकार केला.

ज्यावेळेस मी हे पहात होती त्यावेळेस माझ्या मनामध्ये अनेक विचारांनी घर केलं. अगदी ही मुलं ती माती हातात घेऊन बाप्पा बनवायचे बाजूलाच राहिले, मस्त ती हातामध्ये घेऊन त्याची गोळी बनवत होती. काही खाली ठेवून त्याच्यावर हाताने भाकरी सारखे थापत होते. तर काहीजण डोळ्यांना लावत होते. म्हणजे तो मातीचा स्पर्श त्यांच्यासाठी किती मौलिक आहे आणि तोच आपण हिरावत आहे आणि या सगळ्या आपल्या शहरीकरणामध्ये हा मातीचा स्पर्श कुठेतरी मुलांना मिळतच नाही हळूहळू आदित्यने ज्याप्रमाणे त्यांना गणपती बनवायला शिकवलं. हळूहळू प्रत्येकाचे गणपती आकार घेऊ लागले आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहू लागला.

मी कधीच जे काम केलं नाही की ज्याच्यापासून मला आई-वडिलांनी इतकी वर्ष बाजूला ठेवलं अशा मातीतून मी बाप्पा साकार करतोय शाडूच्या मातीचे गणपती अनेक ठिकाणी दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवले जातात मोठमोठाले प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती हे विद्यार्थी बघतात परंतु आपण स्वतः त्या मातीतून मातीच्या गोळ्यातून की ज्याला काही आकारच नाही अशातून सुंदर एखादी गणपतीची मूर्ती साकारतोय याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो? इतका सुंदर उपक्रम हा पूर्णत्वास आला आणि याच्या पहिली तर गंमतच झाली की आम्ही हा उपक्रम फक्त ७ वी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवला परंतु सहावी आणि सातवीतली काही मुलं कॉन्फिडंटली पालकांची परमिशन न घेता नाव द्यायला आली. या कार्यशाळेत सहभागी व्हायचं आहे म्हणजे कुठेतरी त्यांच्या हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये गणपतीची आस्था किंवा त्यांचा असलेला संबंध इथे प्रकर्षाने जाणवायला लागला.

विद्यार्थ्यांनी खूप सुंदर त्यांच्या कल्पनेनुसार त्यांनी छान छान गणपतीच्या मूर्ती बनवल्या. बाप्पाच्या तिथे उंदीर मामा मोदक हे तर होतेच कोणी लाडूच्या टोपल्या तयार केल्या एवढेच काय आहो…… काहींनी पिझ्झा आणि बर्गर ही त्या गणपती बाप्पाच्या पुढे ठेवली. मुलांचे विश्व हे निरागस असते आणि ते सगळं त्यांच्या कल्पनेतून साकार झाले होतो काही बापाच्या मागे डोक्यावर कुटाच्यावर नाग बनवले होते सर्प बनवले होते काहींनी सिंहासन बनवलं होतं म्हणजेचं डोळ्याचे पारणे फिटेल इतक्या सुंदर मूर्तींनी त्या कार्यशाळेमध्ये आकार घेतला होता. हे हे बाप्पा बघण्यासाठी मुद्दामून शाळेतील प्राथमिक विभागाच्या पहिली व दुसरीचे वर्ग आम्ही बोलवले त्या विद्यार्थ्यांनीही जेव्हा हे गणपती पाहिले त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा लाख मोलाचा ठरला. ते ही गणपती बघून राहिलेल्या मातीला स्पर्श करू लागले आणि त्यातला थोडाशी माती हातावर घेऊन त्याबरोबर खेळू लागले म्हणजे ही मुलं किती आसुसलेली आहेत.

या मातीत खेळण्यासाठी त्यांना या मातीचा स्पर्श कधी होणार हा मोठा प्रश्न आहे. कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मूर्ती वर्गात घेऊन जायला सांगितल्या आणि एका वर्गात तर चक्क ह्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी गणपतीच्या मूर्ती घेऊन गेले जोपर्यंत वर्गात शिक्षक होते त्यावेपर्यंत कुणी हालचाल केली नाही परंतु कुठेतरी मुलांच्या मनामध्ये बाप्पा आले आणि त्यांची आरती व्हावी अशी ही छानशी कल्पना डोकावली असेल आणि मुलांनी गणपती समोर ठेवल्या ज्या वेळेस सांगितले आपल्या वर्गातील हे सुंदर गणपती या विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवायच्या आहेत असं म्हटल्यानंतर टाळ्या तर वाजवल्यास पण ती टाळी शेवटी त्यांनी आरती म्हणण्यास सुरुवात केली.

म्हणजे हा बाप्पा प्रत्येकाच्या मनामध्ये किती खोलवर रुजलेला आहे. त्याच्याविषयीचं प्रेम त्याच्याविषयीचा आदर भक्त्ती त्याच्याविषयीची आस्था इतकं ह्या मुलांच्या भिनलेली आहे असा हा बाप्पा पुढच्या प महिन्यात आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. आमच्या शाळेमध्ये आम्ही बाप्पा बनवण्याची जी कार्यशाळा झाली आहे ती मला वाटतं कुठेतरी सफल संपूर्ण झाली, की जो बाप्पा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती आहे आणि बुद्धीचादाता आहे अशा बाप्पाला एकच विनंती आहे या माझ्या निरागस विद्यार्थ्यांवर त्याची नेहमीच कृपा असावी.

आस

— लेखन : आस
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments