१) बाबासाहेब …
बाबासाहेब …
अजून किती काळ तुमच्यावर आम्ही
फक्त कविताच लिहायची ?
बाबासाहेबांवर नुसती कविता करणाऱ्यांनो…
(माझ्यासहित सर्वांना उद्देशून)
आमच्यात असा ‘महापुरुष’
निर्माण होईल का ?
बाबासाहेबांच्या खडतर आयुष्यातून
प्रत्येकाने एक तरी गुण घ्यावा.
त्यांचे नाव घेण्यापेक्षा,
त्यांना खरा तेव्हा आनंद होईल
जेव्हा आपण समाजकार्य करू !
झोकून शोषित पीडित बांधवात
रूढ सद्धम्म कार्य करावे
आमच्यातून एकतरी
बाबासाहेब निर्माण व्हावे !

– रचना : प्रा. प्रतिभा सराफ.
२) बाबासाहेब, परत या
मला माहित आहे बाबासाहेब,
तुम्ही परत जन्माला येणार नाही,
पुनर्रजन्मावर तुमचा विश्वास नाही ॥१॥
बाबासाहेब, तुमच्या जाण्यामुळे
कमतरता जाणवते आम्हांस श्वासाची,
अन् उरात वेदना होते तुम्ही नसण्याची ॥२॥
बाबासाहेब, परत या
लोकशाहीचा गंज काढण्यासाठी
प्रेतासम झालेल्या
मुर्दांड माणसाला जागविण्यांसाठी॥३॥
बाबासाहेब, परत या
मानवता, बंधुता, समता, न्याय देण्यासाठी,
करपलेल्या चेतनांना फुलविण्यासाठी॥३॥
बाबासाहेब, परत या
दिन, दलित, दुबळे अनाथांसाठी,
आंधळे, अपंग, शोषितांसाठी॥३॥
बाबासाहेब, परत या
समतेचा, ममतेचा धर्म शिकविण्यांसाठी
समजाविण्यांसाठी ॥६॥
बाबासाहेब, परत या
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा सांगण्यांसाठी
गलितगात्र चळवळीत प्राण फुंकण्यासाठी ॥७॥
बाबासाहेब, परत या
मानवाला मानव बनविण्यांसाठी
वंचिताच्या वेदना दूर करण्यांसाठी॥८॥
बाबासाहेब, परत या
गोरगरिबांच्या झोपडीतला अंधकार दूर करण्यांसाठी,
शोषितांच्या दुःखितांच्या सुखासाठी !!
– रचना : पंकज काटकर. काटी, जि-उस्मानाबाद
3) पूज्य बाबासाहेब …
डॅाक्टर होते मानवतेचे माणुसकी परिभाषा
बाबा शोभले खरोखरी ते जगताची आशा….
बावरलेल्या जगास दिधले परिमाण नवे एक
साधुसंतांपरी वागणे नीति होती नेक
हेटाळणीला गेले सामोरे सोसले खूप खूप
बरेच पाणी गेले वाहूनी राहिले तरी मूक
बाबासाहेब ते एकच राहिल फक्त एक
बेरीज केली सदा जीवनी नाही एकही चूक
डगमगले ना स्वत: कधी ही नित्य दाविली दिशा
कधी न केली द्रोहाची हो चुकून ही भाषा
रजतम भावा अव्हेरूनी हो सत्व राखले उरी
बाबासाहेब हा जन्मावे हो पुन्हा ते घरोघरी …
॥शतश: नमन ॥

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
४) 💐हे महामानवा 💐
तिमिरातुनी तेजाकडे |
नेलेस सकल जनांना |
संविधान लिहुन मुक्त केले |
अस्पृशतेच्या शृंखलांना||
शिका,संघटीत व्हा,
संघर्ष करा |
गुरुमंत्र दिधला तू
समाज बांधवांना ||
झुंजलास,झगलास
विजय मिळविलास|
न्याय मिळवून दिला
तू सामन्य जनास||
अखंड भारत,
मजबूत भारत
केले स्वप्न साकार ||
लेवूनी शिक्षणाचा अलंकार |
दूर केला नशीबातील अंधार||
वंदन माझे तुम्हांस त्रिवार |
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ||🙏🙏

– रचना : 💐आ.ज्ञा.दळवी, 💐फलटण 🌹🌹
५) डॉ बाबासाहेब आंबेडकर
तारे येतील तारे जातील
जगतावर राज्य करतील
पुन्हा नव्याने कुणी येईल
कार्याने त्याच्या अमर होईल
बाबासाहेब आठवण्याचा
पुरताच केला तो यत्न
भारत मातेत महू गाव
मातीत जन्मून आलेले रत्न
आज जयंती दिनी बघ
तुजला सलाम तो दिला
शर्तित संघर्षात भिमजीने
भूमित ह्या यत्न प्रयत्न केला
तुझी नानाविध अंगे आम्हा
शिकवण देत राहतील
मानव म्हणून जगताना
नवनवी शिदोरी वाटतील
संघर्ष गाथा इथे बघ
सामर्थ्य शाली बनवून गेली
आयुष्याची पुरती हयात
समाज मानवासाठी खर्च केली
बनून आलास तेव्हा तूच
युगपुरुष प्रवर्तक क्रांतीकारी
तुझ्या कर्तृत्वाने साकारली
शब्दांची शस्त्रे ती विचारी
घटनेचा तू शिल्पकार
दलित पतिताघरी देव
प्रत्यक्ष भगवंतासम
वागणे महामानव एकमेव
जन्मदिवस तो, ती जयंती
होते थोर मोठ्यांची
भूमी संत, महंत, तत्त्ववेत्त्यांची
कदर रहावी नररत्नांची
भिमराव बाबासाहेब
नाव हे फिरे ओठांवर
प्रत्यक्ष शारदा देवी नाचे

– रचना : सौ माधवी प्रसाद ढवळे. रत्नागिरी
धन्यवाद भुजबळ सर सर्व कविता अतिशय सुंदर लिहील्या आहेत माझ्याही कवितेला आपण पृष्ठावर आणल्या बद्दल मनस्वी आभारी आहे आपल्याला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹
🌹सर्व कवी / कवियत्री हार्दिक अभिनंदन 🌹
खूप छान, प्रेरणादायी लिखाण.
अशोक बी साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ
आजच्या NST मधून क्रांतीसूर्य महामानव आंबेडकरांना अतिशय
उचीत,आदरपूर्वक ,प्रेमादराने श्रद्धांजली वाहण्यात आली.
सर्वच लेख उल्लेखनीय.
भारतातील हे अनमोल रत्न! परमपूज्य..!!