आज २९ जुलै.
बाबूजी, अर्थात गायक, संगीतकार सुधीर फडके यांचा स्मृती दिन. त्या निमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्दांजली.
आपणा सर्वांचे जीवन समृद्ध करणाऱ्या बाबूजींनी विनम्र अभिवादन.
– संपादक
कवितांची झाली गाणी
विरून गेली विराणी
स्वरात भिजले सुरात रमले
ताल लयीच्या चालीत हरवले
स्वरसम्राट उदयास आले.
नाद ब्रह्मी टाळी लागली
अजरामर गीते जन्मास आली
स्वर्गीय आवाजाने सम गाठली
साथ संगीताची अवर्णनीय झाली
पूर्व संचीताचे भाग्य लाभले
गीत रामायणाने शिखर गाठले
गोड गळ्याने जग जिंकले
संगीताने सुवर्णक्षण वेचले
अविस्मरणीय क्षण आनंदाचा
गीतरामायण यशाचा आशयघन
भाव विभोराचा अभिजात संगीताचा
कृतकृत्य झाले जीवन
परी अस्वस्थ राही मन
अपूर्णता राही आयुष्यात
घालमेल होई जीवात
निर्मिती स्वातंत्र्यवीर सावरकर ची
परीपूर्ती अथक प्रयत्नांची
तीव्र ध्येयासक्तीची
सर्वस्वाचे झाले योगदान
कृतार्थ झाले जीवन
सार्थकी लागले मानसन्मान
स्वर गंधर्वाला सलाम
शांत निवांत ज्योत निमाली
स्वरगंधर्वाला दुनिया मुकली
मूक मनाने श्रद्धांजली वाहिली
— रचना : मीरा जोशी. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
माननीय सुधीर फडके, वर छान कविता (रचना) लिहीली.👌🙏