डॉ विजया वाड हे मराठी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील एक अतिशय मोठं नाव….त्यांनी या वर्षी त्यांचा ८१ वा वाढदिवस ५० बालकवितांची छोटी पण आकर्षक पुस्तके प्रसिद्ध करून, आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा केला.
नाशिक येथील ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ या संस्थेची या वर्षीची २२ वी राज्यस्तरीय बालकवी स्पर्धेच्या निमित्ताने स्वरचीत काव्य करणाऱ्या विद्यार्थ्याना एक नवीन संधी मिळाली.
विजयाताईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कवी अरुण म्हात्रे यांनी बालकवी स्पर्धेबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या स्पर्धेत स्वरचित काव्य करणाऱ्या बाल दोस्तांसाठी योग्य कविता विनामूल्य संपादित करण्यासाठी लगेच होकार कळवला.
आपल्या बालकविंच्या स्वरचित ११ रचना आणि कवयत्री, शिक्षिका सौ वासंती पाठक यांच्या २ बालकविता ‘असे वाटते जावे तेथे’ या नावाने संपादित केल्या. कवी अरुण म्हात्रे यांचे हे काम खरोखर कौतुकास्पद आहे.
बालकवी स्पर्धेतील स्वरचित काव्य करणाऱ्या बालकविंचा “बालकाव्यधारा २” हा कवितासंग्रह नाशिक येथील अखील भारतीय साहित्य संमेलनात प्रकाशित झाला. त्याला आकर्षक बनवण्याचे काम अष्टपैलू श्री चिदानंद फाळके यांनी केले.
आपणा सर्वांसाठी सदर पुस्तक सहज वाचनासाठी पुढील लिंकवर उपलब्ध करीत आहोत.
https://drive.google.com/file/d/1tbFmFG6jbxdHjg1oumFdEIH8_X82q1BA/view?usp=sharing
सर्व साहित्य रसिकांनी हे ई पुस्तक अवश्य वाचून आपला अभिप्राय कळवावा, असे आवाहन या स्पर्धेचे आयोजक, ज्ञानवर्धीनी विद्याप्रसारक मंडळाचे सचिव श्री.गोपाळ पाटील यांनी केले आहे .
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
स्तुत्य उपक्रम आहे कविता करणार्यांना प्रोत्साहनकविता करणार्यांना प्रोत्साहन मिळेल यातून