Thursday, November 21, 2024
Homeसाहित्यबालक दिन…

बालक दिन…

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज जयंती आहे. बालकांमध्ये “चाचा नेहरू” म्हणून प्रिय असलेल्या नेहरुजींचा जन्म दिवस “बाल दिन” म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने वाचू या ही कविता.
पंडित जवाहरलाल नेहरु यांना विनम्र अभिवादन.
– संपादक

वाढदिवस तर हवा हवा
आपल्याला ते खरं तर हवे असते.
वय हे शहाणं करत मोठं करत असते.
हळूहळू बालपणातील निरागसता
कुठे, का हरवत असते ?

आपलं जगण्याचे वर्तुळ मोठे
होत असते आणि त्याबरोबर जगताना
मन जागृतपणे कुठे कसे वागावे शिकवत असते.
मग कधी खोटे कधी नकलीमुखवटे
चेहर्‍यावर आणत का जगत असते ?

भान हरवून आपल्या, जवळच्या
बालमित्रमंडळींबरोबर मग
आपले मन मोकळे निरागस
कसे बरं असते ?

ते बालपण, ती निरगसता,
ते निष्पाप ती आपुलकी
तेव्हा आपल्यातलं बालमन
फुलपाखरासारखे का जगत असते ?

आपल्या त्या निखळ हास्यात
पद, प्रतिष्ठा, संपत्ती, प्रसिद्धी
काहीही कामाची नसते
तेव्हा आपल्या मनातलं बालपण
खरं जगायला तर शिकवत असते

प्रत्येकाच्या मनात एक बालमन असते
तो कोपरा, तो दरवाजा ती खिडकी उघड
आणि काही क्षण आत जगून तर बघ
हेच तुझं आयुष्य, हेच तुझं जीवन

बालका प्रमाणे निरागस जग
निर्मळ मनासारखं जगुन तर बघ
मनातला खरा आनंद शोधत
बालमनासारखे जगण्यासाठी
बालदिनाच्या अनेक हार्दिक
निरामय शुभेच्छां

पूर्णिमा शेंडे.

— रचना : पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— रचना : अलका भुजबळ.☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments