भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज वाढदिवस आहे. हा दिवस बालदिन म्हणून भारतभर विविध उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात येतो.
ग्रामीण भागातील एका शाळेत मात्र तो अनोख्या पद्धतीने आज साजरा करण्यात आला. या अनोख्या उपक्रमाबद्दल आयोजक शिक्षक, विद्यार्थी यांचे मन:पूर्वक अभिनंदन
– संपादक
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील
काटी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओली भेळ तयार करुन अनोख्या पध्दतीने आजचा बालदिन साजरा केला.
यासाठी चौथीच्या विद्यार्थ्यांनी घरातुन येताना चुरमुरे, चिवडा, शेव, कांदा, टॅमोटो, कोंथीबिरी, लिंबु, चिंचगुळ पाणी तयार करुन आणले.
या सर्व साहित्याचे एकत्रिकरण एका मोठ्या पातेल्यात वर्गशिक्षक श्री.पंकज काटकर सर यांनी केले. बारीक कांदा कापुन, टॅमोटो ही बारीक कापले. ते सर्व पातेल्यात टाकुन त्यावर छोट्या भांड्यात चिंचगुळ पाणी तयार केले. हे चिंचगुळ पाणी घालुन ओली भेळ तयार केली. वरुन शेव, कोथींबिरी बारीक कांदा, टॅमोटो टाकला. हे सर्व मिश्रण एकत्रित करत भेळ तयार केली.
ही ओली भेळ चौथीच्या ४० विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.
वर्गस्तरावर हा उपक्रम घेण्यात आला. यातुन अनोख्या पध्दतीने बालदिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना यातुन स्वनिर्मितीचा आनंद तर मिळालाच त्याचबरोबर संघटन, मैत्री प्रेम, ऐकोपा, एकत्रित भेळ खाण्याचा आनंद, पाककृती तयार करण्याची माहिती झाली.
या उपक्रमाविषयी बोलताना काटकर सर म्हणाले की, हा या वर्गाचा ‘झिरो बजेट’ उपक्रम होता. यासाठी घरातील साहित्य वापरण्यात आले. या उपक्रमाची प्रेरणा आम्हांला श्री.राहुल गवळी सर, प्रा.शा.वाणेवाडी आणि प्रा.शा.होर्टी चे बालाजी माळी सर यांच्याकडुन मिळाली. हाच प्रयोग त्यांच्या शाळेत सुरुवातीला झाला होता. या प्रेरणेतुन आज बालदिनानिमित्त हा उपक्रम शाळेत घेण्यात आला.
अशा प्रकारे पं.जवाहरलाल नेहरु यांना अनोख्या पध्दतीने विद्यार्थ्यांनी अभिवादन केले !
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
सुंदर उपक्रम