Monday, February 2, 2026
Homeसाहित्यबाल कविता : खेळा मुलांनो

बाल कविता : खेळा मुलांनो

नमस्कार मंडळी.
आपल्या कालच्या पोर्टल वरील, “मुलामुलींनो मैदानावर खेळा” हा वृत्तांत वाचून कवी गोविंद पाटील यांनी त्यांची, मुलांनी मैदानावर खेळण्याविषयीची कविता पाठवली आहे. ती पुढे देत आहे. पाटील सरांचे मनःपूर्वक आभार.
— संपादक

खेळा मुलांनो खेळा
मैदानी खेळ खेळा ||धृ ||

खो – खो खेळ खेळा
मित्रांचा होईल मेळा

कबड्डीत सहभाग घ्यावा..
खेळण्यात जिद्द ठेवा

खेळा मुलांनो खेळा
मैदानी खेळ खेळा ||१||

शरीर तंदुरुस्त ठेवा
मित्रांना वाटावा हेवा

स्पर्धेत बक्षिस जिंका
आनंद सन्मान मिळवा

खेळा मुलांनो खेळा ||२||
मैदानी खेळ खेळा

स्पर्धेच्या युगात पुढे..
तुम्ही का राहावे मागे

खेळात अपयश-यश असते
आयुष्य यानेच घडते…

खेळा मुलांनो खेळा
मैदानी खेळ खेळा ||३ ||

गोविंद पाटील.

— रचना : गोविंद पाटील. पाथरी, नेहरूनगर, जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9