हडपसर, पुणे येथील व्हिनस वर्ल्ड स्कूल मध्ये इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या स्वरूप शेलार या अवघ्या १० वर्षे वयाच्या बाल गियोरोहकाने मनाली (हिमाचल प्रदेश) येथील पिर प्रांजल पर्वत रांगेतील पतालसू व फ्रेंडशिप ही दोन्ही शिखरे एकाच मोहिमेत सर करण्याचा विक्रम केला आहे.
स्वरुपला लहान वयात ट्रेकिंगचा छंद जडला. वडकी मार्गे पुरंदर तालुक्यातील कानिफनाथ गडावरील पहिली चढाई त्याने वयाच्या पाचव्या वर्षी केली. त्यातूनच त्याला डोंगर दऱ्यांची माहिती जमवून अभ्यास करण्याचा ध्यास लागला. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर त्याने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी सर केले, त्याच्या या कामगिरीने लहान वयाचा गिर्यारोहक म्हणून त्याची ओळख झाली.
स्वरुपला क्रीडा शिक्षक असलेल्या आई नीलम शेलार व खाजगी कंपनीत नोकरी करत असलेले वडील प्रवीण शेलार यांच्याकडून बाळकडू मिळाले. तसेच आजी पोलिस निरीक्षक द्वारका डोखे यांच्याकडून त्याला ट्रेकिंगची प्रेरणा मिळाली.
ड्रीम अॅडव्हेंचर संस्थेने पतालसू, फ्रेंडशिप आणि माऊंटन शितीधर या शिखरांची मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेत एकूण १६ सदस्यांनी सहभाग घेतला होता. त्याचे नेतृत्व महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले एव्हरेस्टवीर रफिक शेख यांनी केले. या मोहिमेत छोटा स्वरूपही सहभागी झाला होता.
सदर मोहिमेसाठी उद्योजक श्री.दशरथ जाधव, व्हिनस वर्ल्ड स्कूलचे संचालक श्री.माधव राऊत, प्राचार्या सौ मृण्मयी वैद्य, पोलिस हवालदार ब्रम्हादेव मेटे, गणेश पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
या बाल शिखरवीराने कमी वयात दोन्ही शिखरे एकाच मोहिमेत सर केल्यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.
स्वरूपचे पुढचे ध्येय आहे आफ्रिकेतील किलो मांजरो हे शिखर सर करायचे. त्यासाठी छोट्या शिखरवीराला “एक हात आपुलकीचा” हवा आहे ज्याने तो आपली स्वप्ने पूर्ण करु शकतो.
स्वरुप हा सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे आई-वडील त्याला यासाठी नेहमी प्रोत्साहन देतात आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात. आपण सुद्धा यात खारीचा वाटा उचलावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी खाली त्याचा खाते क्रमांक आणि संपर्क क्रमांक देण्यात आला आहे
“प्रवीण शेलार”
मोबाईल नंबर – 9850079255.
खाते क्रमांक – स्वरुप शेलार
A/c-76530100011571
IFSC code -411012082
Bank of Baroda.
– लेखन : अमिता कदम
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800