खाल्लाच पाहिजे का
चौरस आहार ?
जस्ट इटालियन,
थोडंस कॉन्टिनेंटल
ढिगभर चायनीज
फारच झालं तर
वाचतो ना आम्ही
ऋजुता दिवेकर
नियमित नियमित
पाहिजे विहार ??
वॉक म्हणे
केलाच पाहिजे
स्वतः करावा म्हणे
योगा तो भारी भारी,
पाहण्या मी नित्यानेमी
नुसता टीव्ही ऑन करी
आपलीच शिकवण
जस्ट ट्राय केली ऋतुने
सुस्तावून थोडासा
लावला बोर्ड थंडीचा
पाऊस आणून मृगाचा
आभासी छटा थंडीची
करी गुलाबी रंग निराळा
थंडीपाऊस झिम्याचा
केला रंग कुंद सावळा

– रचना : ममता मुनगीलवार