दिल्लीतील मैफिल कुटुंबिय अभिनव अशा लोकांची कहाणी समाजाला आणि दिल्ली परिसरातील मराठी जणांना व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो.
महाराष्ट्रात कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. याच परिस्थितीत लोकाना पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, अशा अनुभवी माणसाची मुलाखत मैफिल समूहाने नुकतीच आयोजित केली होती.
प्रत्येक माणसाला फक्त व्यवसायात नफा आहे असे वाटते. पण असे असतेच असे नाही. प्रत्येक व्यावसायिक व्यक्तीला व्यवसाय छोटा असो वा मोठा त्या त्या परिघाच्या मर्यादेतील व्यावसायिक अडचणी, आर्थिक समीकरणे आणि मार्केटमधील चढउतार यांना सामोरे जावेच लागते. हे जरी स्विकारार्ह असले तरी अनेक वेळा या साऱ्या आट्यापिट्यात जेव्हा दमछाक होते, आपले मानसिक बळ खचू न देता टक्कर देण्याचे आणि वाट काढण्याचे सामर्थ्य आपले आपल्यालाच एकवटावे लागते. हे विचार मिलिंद जहागीरदार यांनी मांडले.
“मैफील कुटुंबीय दिल्ली”
आयोजित ‘मैफील गप्पा’ हा ऋचा मयी यांनी घेतलेला मिलिंद जहागीरदार यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम, “बेकारी बिस्कीट अन…” म्हणजे लहान मोठ्या सर्वच व्यावसायिकांसाठी एक मार्गदर्शक तत्व सांगणारी कार्यशाळाच होती.
“झोकून देऊन काम करण्याची तयारी तसेच स्वतःवरील विश्वास आणि आजचा आपला परीक्षा पाहणारा दिवस हे ही दिवस जातील ही स्वतः च स्वतःला दिलेली आश्वस्त भूमिका प्रत्येकाने अंगीकार केली पाहिजे. तसेच क्वालिटीच्या बाबतीत अजिबातच न केलेली तडजोड या विचारानेच आणि इच्छाशक्ती असेल आणि जर मजबूत पाया असेल तर आर्थिकदृष्टया नफ्यातोट्याची तफावत, दुर्दैवाचे कोणतेही फेरे, रोज उगवणारा सूर्य घेऊन येणारी नवी अडचण या साऱ्यावर स्वार होताना मजाच वाटते आणि आपला आपल्याला सार्थ अभिमान वाटतो” अशा शब्दात मिलिंद जहागीरदार यांनी आपले विचार मांडले.
त्याचबरोबर “अशा उद्योजक आणि अनुभवी लोकांच्या अनुभवाच्या शिदोरीतील घास खाताना आपण आपलीही भाकरी छोटी असली तरी चांगली तावून सुलाखून भाजून घेतली आहे याची खात्री पटते. oh, I Am On The Right Track ही जाणीव मनाला बिनधास्त बनवते”. अशी प्रतिक्रिया मैफिल पाहणारे प्रेक्षक म्हणून प्रज्ञा लळिंगकर यांनी व्यक्त केली
आपल्या कामाबाबत आग्रही असणारे मिलींद यांनी वाणिज्य पदवी घेतली. त्यानंतर गुजराथ ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, आणंद येथून बेकरी टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
पुढे ब्रिटानिया बिस्किट कंपनीत 1985 पर्यंत 8 वर्षे नोकरी केली आणि कामाचा अनुभव घेतला. तसेच बेकरीसाठी लागणाऱ्या विशिष्ठ साहित्याचे उत्पादन व एजन्सी आणि बेकरी कन्सल्टन्सीला सुरुवात केली.
त्यांनी स्वतःच्या कॉंटिनेंटल फूड्स या व्यवसायाची 1990 साली सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत ते बेकरी व्यवसायामध्ये काम करत आहेत आणि अनेकांना मार्गदर्शन पण करत आहेत.
एकंदरीतच मैफिलची मैफिल मस्त जमत चालली आहे.

– लेखन : कमल अशोक. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
Telegram app वर. https://t.me/maifil या लिंक वर या कार्यक्रम utube link मिळेल अन इतर कार्यक्रम लिंक पण मिळेल.
छान लेख. एका उद्योजकाचा परिचय! त्यांचे अनुभव ऐकायला आवडतील. If the interview is recorded , please share the link.
Thanks
http://www.maifil.in
आणि
मैफिल Utube वर आहे.