भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी संस्कृती हा देशाचा प्राण आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही.
कृषी संस्कृती म्हटले की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपसूकच येतात. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे पोळा.
महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र, प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत वेगळी असल्याचे पाहायला मिळते.
शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या या सर्जाराजाच्या
शिंगांपासूनचा पुढील भाग आणि मानेच्या वरचा भाग म्हणजे खांदा. . या दिवशी सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जाते.
पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. खांदेमळणी ही सुद्धा विशेष असते. यावेळी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात. म्हणजेच बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते. पोळा सणाच्या अनुषंगाने या दोन दिवसांत तरी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही. दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते. शेतकरी बांधव आज त्यांची खांदे मळणी करून बैलांची सेवा करण्याचा दिवस मानतात.
आजच्या यंत्र युगात ही बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो हे विशेष…

– छायाचित्रकथा : विजय होकर्णे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800