शब्द शब्द मनातले
भाव तरल हृदयीचे
दाटलेल्या सांजकाली
सतार तार छेडीली
ती मनीची आर्तता
हृदयीची ओढ ती
दाटलेल्या सांजकाली
लोचनात दाटली
राधिका ती कृष्णवेडी
यमुनेच्या तीरावरी
दाटलेल्या सांजकाली
मीलना आतुरलेली
नभ विलसला क्षितिजी
वसु मनी लाजली
लेखणी बोलू लागली
दाटलेल्या सांजकाली
– रचना : नेहा हजारे, दुबई
वाह क्या बात है