बोलू नको कुणा अन् सांगू नको कुणाला
बोलले जरी कुणी ते लावू नको मनाला … ॥धृ॥
तू फुल पाकळी ग अलवार तू बकुळ
तू उद्धरून जाते दोन्ही कुळे समूळ
तुज सारखी न कोणी
तू सांग ना स्वत:ला
बोलले जरी कुणी ते लावू नको मनाला ॥१॥
तू स्वप्न ग मनीचे
त्या मोगरा कळीचे
वादळ येऊ दे ना ते किती ही धुळीचे
तव गंध मोगऱ्याचा कळणार ग जगाला
बोलले जरी कुणी ते लावू नको मनाला ॥२॥
जनरीत ही उगीच तू पाळते कशाला
तू स्वप्न सुंदरी ग स्वप्नेच घे उशाला
स्वप्नातला तुझा मी समजावी तू मनाला..
बोलले जरी कुणी ते लावू नको मनाला ॥३॥
— रचना : प्रा.सौ.सुमती पवार. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
बोलू नको अप्रतिम रचना सुमती ताई
तू उद्धरून जाते दोन्ही कूळ सारख्या अनेक ओळी
मनाला खूप भावल्या
स्त्री शक्तीच्या उमलल्या कळ्या
अभिनंदन 🌹🌹 ताई
सुंदर काव्य रचना ताई
सुंदर रचना