Friday, November 22, 2024
Homeबातम्याब्राझीलला निघालेल्या समृद्धीचा सन्मान

ब्राझीलला निघालेल्या समृद्धीचा सन्मान

आपापल्या देशाच्या समृद्ध परंपरेचा प्रचार व प्रसार करण्याची उत्तम संधी रोटरी क्लब तर्फे रोटरी युथ एक्सचेंज प्रोग्राममार्फत युवकांना मिळत असते.
अत्यंत प्रतिष्ठित आणि खूप स्पर्धा असलेल्या
या कार्यक्रमात पुणे येथील १६ वर्षीय कु.समृद्धी नितीन विभुते हिची निवड झाली असून ती आज ब्राझील साठी रवाना होत आहे.

या निवडीबद्दल न्यूजस्टोरीटुडे परिवारातर्फे सह संपादक अलका भुजबळ यांनी तिला न्यूजस्टोरीटुडे चा ‘मग’ देऊन सन्मान केला व शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी समृद्धीची आई सौ ज्योती, वडील श्री नितीन विभुते, आजी सौ रेखा विभुते व ‘न्यूजस्टोरीटुडे’ चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ, सौ त्रिवेणी डोईफोडे आदी
उपस्थित होते.

परिचय
समृध्दी नुकतीच दहावी पास झाली आहे. लहानपणापासूनच ती आवडीने आई वडिल,
रोटेरियन नितीन विभुते आणि ज्योती नितीन विभूते -चाळसे यांच्यासोबत गेली १४ वर्षे रोटरी क्लब मध्ये येत असून नाटक, नृत्य आणि इतर विविध उपक्रमात हिरीरीने सहभागी होत आली आहे.

समृध्दीचे वडील रोटेरियन श्री नितीन सखाराम विभुते हे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असून सीसीटीव्ही, इलेक्ट्रिकल्स, वॉटर सप्लाय मध्ये डिजाइनिंग, इन्स्टॉलेशन, कमिशनिंग ची कामे करतात. आई रोटेरियन सौ ज्योती विभुते-चाळसे या त्यांना व्यवसायात पूर्ण मदत तर करीतच असतात शिवाय मसाले व बारा महिने चकली
उत्पादनाचा व्यवसायही करीत आहेत. त्या उत्तम गृहिणीही आहेत.

विशेष म्हणजे समृद्धी ही त्यांची एकुलती एक मुलगी असूनही तिची निवड झाल्यावर, इतके दूर, तेही एका वर्षासाठी कशाला पाठवायचे असा विचार न करता, तिच्या भविष्याचा विचार करून तिच्या पालकांनी तिला ब्राझील देशामध्ये एक वर्षासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री नितीन यांचे वडील सखाराम विभुते आणि आई सौ रेखा सखाराम विभुते हे दोघेही वारकरी संप्रदायामध्ये असून आजही या संदर्भातील जमेल तेवढे सर्व कार्य
भक्तीभावाने करतात. तर भाऊ श्री सचिन विभुते व सौ अरुंधती विभुते व त्यांची दोन मुलं, मुलगा अद्विक
व मुलगी दीविना, हे अमेरिकेत स्थायिक आहेत.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. कु. समृद्धी हिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा 🌹

  2. 🌹हार्दिक अभिनंदन समृद्धी 🌹
    🌹पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments