रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे देशादेशात मैत्रीचं, बंधू भावाचे नातं निर्माण होण्यासाठी युवकांना दुसऱ्या देशातील कुटुंबात वर्षभर ठेवण्यात येते.
या उपक्रमांतर्गत पुणे येथील, नुकतीच दहावी पास झालेली समृध्दी विभुते ही मुलगी गेल्या महिन्यात ब्राझील ला रवाना झाली आहे.
आपल्या पोर्टल साठी ती नियमितपणे ब्राझील डायरी लिहिणार आहे.
समृध्दीचे अभिनंदन व स्वागत करू या…
– संपादक
13 जुलै 2022 बुधवार.
हा दिवस जो माझा ब्राझीलला एकटीने जाण्याचा दिवस होता रोटरी युथ एक्सचेंजचा एक भाग म्हणून.
त्या दिवशी मला माझ्या प्रवासाबद्दल खूप आनंद झाला. माझे आई-वडील आणि माझा देश सोडणे माझ्यासाठी खूप कठीण होते. परंतु मला १ वर्षासाठी सोडावे लागेल याची जाणीव पण होती.
13 जुलै रोजी माझी फ्लाइट तिथे संध्याकाळी 6:00 होती. मी मुंबई विमानतळावर दुपारी 2:00 वाजता पोहोचली. त्या वेळी मी माझ्या आई-वडिलांचा आणि माझ्या देशाचा निरोप घेतला.
6:30 वाजता मी विमानात बसले. आणि 6:45 वाजता विमानाने उड्डाण केले. माझा हा अनुभव खूप छान वाटत होता. मला विमानाने प्रवास करायला आवडत होते. मी दोहा विमानतळावर पोहोचले. तेव्हा तिथे 6 तास वेळ घालवणे थोडे कठीण होते. पण मी ते चांगले घालवले.
माझी दुसरी फ्लाईट मध्यरात्रीची होती. ती 15 तासांची होती. कतार एअरलाइन्स, त्यांनी मला खूप छान जेवण दिले जे मला खूप आवडले. मी विमानात चित्रपट पाहण्यात आणि खिडकीतून बाहेर पाहण्यात आणि लोकांशी बोलण्यात वेळ घालवला. हा एक छान अनुभव होता. मग शेवटी मी साओ पाउलो विमानतळावर पोहोचली.
मी माझ्या नव्या कुटुंबाला भेटायला खूप उत्सुक होती. 1 तासानंतर मी माझ्या यजमान कुटुंबाला भेटली. त्यांनी माझे ब्राझीलमध्ये स्वागत केले.
एकट्याचा प्रवास अनुभवायला खूप छान वाटलं. या एकट्या प्रवासाच्या अनुभवामुळे मला स्वतःचा अभिमान वाटला की मी माझे सर्वोत्तम काम केले आहे आणि मी एकट्याने प्रवास करण्यास स्वतंत्र झाली आहे.
16 जुलै 2022 शनिवार.
मी माझ्या नवीन बहिणी, भाऊ आणि आजी आजोबांना भेटण्यासाठी माझ्या कुटुंबासह त्यांच्या फार्महाऊसवर गेली. फार्महाऊसमध्ये जाताना कुटुंबीयांनी मला दुकाने दाखवली. मी अनेकांचे निरीक्षण केले. शेती खूप मोठी आणि शांत जागा होती. निसर्ग खूप छान होता. मी ब्राझिलियन गोड खाल्ले आहे त्या वेळी ते खूप छान होते. त्या वेळी मी जेव्हा शेतात जात होते, तेव्हा मला मी भारतातच असल्याचा भास होत होता. सगळा निसर्ग आणि हवामान भारतासारखे होते. अगदी शेतही भारतीय गावासारखे होते. कुटुंबासोबत छान वेळ गेला. त्यांनी मला आपल्या संस्कृतींबद्दल विचारले. जसे की विवाह कसे होतात, शिक्षण प्रणाली आणि खूप काही जाणून घेण्यासाठी ते खूप उत्सुक होते. मला भेटून त्यांना खूप आनंद झाला.
क्रमशः

– लेखन : समृध्दी विभुते. ब्राझील
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800
🌹वा काय सुंदर अनुभव छोट्या चिमुकलीचा 🌹
भुजबळ साहेबांचा last references, relevant.
खूप सुंदर
🌹धन्यवाद 🌹