Homeबातम्याब्रेल लिपी : दोन पुस्तके प्रकाशित

ब्रेल लिपी : दोन पुस्तके प्रकाशित

नवी मुंबईतील जेष्ठ पत्रकार, लेखक श्री राजेंद्र घरत यांच्या ‘अर्थ असा आणि तसा’ व ‘शेजारी आणि शेजारधर्म’ या ब्रेल लिपीतील अनुक्रमे एकतिसाव्या व बत्तीसाव्या पुस्तकांचे प्रकाशन रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालु्‌क्यात असणाऱ्या घराडी येथील स्नेहज्योती अंध निवासी विद्यालयात नुकतेच झाले. यावेळी विचारमंचावर शिवव्याख्याते प्रा. रविंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र औटी, अंधशाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा प्रणव सेनगुप्ता उपस्थित होत्या.

नवी मुंबईतील शिवतुतारी प्रतिष्ठान – कविता डॉट कॉम यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात बोलताना प्रा. रविंद्र पाटील आणि रविंद्र औटी यांनी इतक्या दुर्गम भागात स्नेह ज्योती शाळेने चालवलेल्या अंधसेवेची प्रशंसा करून या शाळेमध्ये राजेंद्र घरत यांच्यामुळे येता आले, येथील मुलांचे भावविश्व जाणून घेता आले, त्यांच्यासाठी सेवा देणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हितगुज साधता आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अशी पुस्तके ब्रेल लिपीत गेल्यामुळे त्यातील भावना, विचार दृष्टीहीन विद्यार्थ्यांनाही वाचता येतील, डोळसांच्या जगात काय चालले आहे याचा अंदाज बांधता येईल असेही वक्त्यांनी नमूद केले.

ही पुुस्तके ब्रेल लिपीत रुपांतरीत करणाऱ्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता यांना विशेष धन्यवाद देण्यात आले.

लेखक घरत यांनी मनोगतातून या शाळेशी आपले भावबंध गेल्या १८ वर्षांपासून जोडले गेले असून या वास्तूत आल्यावर अनोखी उर्जा लाभते असे सांगत याहीपुढे विविध मान्यवर व्यक्ती, संस्थाचालक यांना येथे आणायचा उपक्रम सुरुच ठेवू असा विचार बोलून दाखवला.

नवी मुंबईत सिडको प्रदर्शनी केंद्रात अलीकडेच भरवण्यात आलेल्या बाल मराठी संमेलनात ‘बाप माझा’ ही स्वरचित कविता सादर करुन दहा हजाराचे शासकीय पारितोषिक पटकावणाऱ्या आठवीतील विद्यार्थी प्रसाद माळी याने यावेळी येथील दृष्टीहीन मुलांसमोर तीच कविता सादर करुन उपस्थितांना भावविभोर केले.

सूत्रसंचालनाची बाजू नारायण लांडगे पाटील यांनी सांभाळली.

काही दात्यांनी पाठवलेल्या भेटवस्तू व अन्य मदत याप्रसंगी शाळेकडे सुपूर्द करण्यात आल्या.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments