आयुष्यात संधी येते
कधी भविष्यात चालून
नाही तर आयुष्यच
जाते कधी मावळून
निःस्वार्थ संधी शिकवते
आयुष्य जीवन सार
कळली संसार नौका
भवसागर करी पार
शिक्षणाचे महत्त्व न
कळले त्यासी जीवनात
खेळ, मटका, जुगार नाद
हरवतो सर्कस रिंगणात
सोन्यासम आयुष्य हे
असते मानवा सुंदर
संधीचे सोने करावे
देव निरखे मनोहर
धन संपदा सुटते
अंती वाहते सरण
संधी सोन्याहून पित
आठवावे नामस्मरण

— रचना : शोभा प्रकाश कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
