नंदुरबार जिल्ह्यातील भांगरापाणी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत गट स्तरीय क्रिडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.
अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय व अनुदानित वीस आश्रमशाळेच्या सातशेहुन अधिक विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तीक क्रिडा प्रकारात सहभाग नोंदवला होता. दिनांक २० व २१ सप्टेंबर रोजी मुलांच्या तर २२ व २३ सप्टेंबर रोजी मुलींच्या क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या गट स्तरीय क्रिडा स्पर्धाचे उद्घाटन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्री.डॉ.मैनक घोष, आय ए एस यांच्या हस्ते झाले.
चार दिवस चाललेल्या गट स्तरीय क्रिडा स्पर्धात चौदा, सतरा व एकोणविस असे तीन गट तयार करून सांघिक खेळात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल व रिले तर वैयक्तिक खेळ प्रकारात थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, लांबऊडी, उंचऊडी, धावणे, चालणे अशा स्पर्धांचा समावेश होता.
समारोप एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा येथील शिक्षण विस्तार अधिकारी श्री.बी.आर.मुगळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. श्री.मुगळे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून दिले. अभ्यासा बरोबर मैदानी खेळ किती महत्वाचे आहेत याची विद्यार्थ्यांना जाणिव करुन दिली .
या प्रसंगी भांगरापाणी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एम. एन. तडवी यांनी सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचा व क्रिडा शिक्षकांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार केला.
या क्रिडा स्पर्धेच्या समारोपा प्रसंगी व्यासपीठावर
श्री.के.आर.पाडवी (आदिवासी विकास निरीक्षक, तळोदा), भांगरापाणीचे पोलीस पाटील श्री. विनोद वसावे, श्री.जे.टि.वळवी, श्री. के.पी. अलकारी, श्री.ए. बी. नगराळे, श्री.एस.सी.जगदाळे, श्री.बी.के.महिरे, श्री.ए.बी.चव्हाण श्री. एस.एस. राठोड, श्री.व्ही.व्ही. नाईक श्री. एम. बी. गिरासे उपस्थित होते.
या क्रिडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यातील अध्यक्ष, सदस्य तसेच सर्व शिक्षक, प्रमुख पंच, पंच, सहाय्यक पंच, गुण लेखक, टाइम किपर सर्व सहभागी शाळेचे क्रिडा शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, भांगरापाणी शाळेचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, सौ. एस.एस.अलकारी यांनी तर प्रास्ताविक श्री. संजय अहिरे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. एन. तडवी सर यांनी आभार मानले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800