निवृत्त माहिती उपसंचालक श्री सुधाकरराव धारव आज पासून 85 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या विषयी त्यांच्या सुहृदाने व्यक्त केलेल्या या भावना.
धारव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
यवतमाळ भावसार समाजामध्ये अत्यंत आदरणीय व्यक्तीमत्व असलेले श्री सुधाकरराव अमृतराव धारव यांचा काल वाढदिवस होता. वाढदिवसाच्या भाऊंना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. वयाची ८४ वर्षे पूर्ण करून भाऊ आज ८५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
ज्या काळात मॅट्रिक पर्यंतचेच शिक्षण अर्थार्जनास्तव नोकरीसाठी खूप समजले जायचे, त्याकाळचे भाऊ पदवीधर. सुदैवाने भाऊंचे वडील यवतमाळ कलेक्टर कार्यालयात अधिक्षक होते. आजोबा पणअबकारी विभागात होते अन् पणजोबा जिल्हा नाझर होते. भाऊ पण प्रथम तेथेच लागले.
पुढे जिल्हा माहिती अधिकारी, माहिती उपसंचालक अशा सुपर क्लासवन पदावर कार्यरत राहून सेवानिवृत्त झाले.
भाऊ म्हणतात, माझ्या वर राम पाथरकर सरांचे उपकार आहेत.
पवनार आश्रमात आचार्य विनोबा भावे, शिवाजी भावे, दादा धर्माधिकारी, खान अब्दुल गफारखान, यांची सेवा करण्याची मला संधी मिळाली.
आवडते जिल्हाधिकारी म्हणून भाऊ बी. जी. देशमुख, एस. जी. दैठणकर. आयुक्त हणमंतराव कुलकर्णी, मूख्य सचिव पी. जी. गवई, करीर सर.
महासंचालक अजित वर्टी, डॉ नितीन करिर यांचे भाऊ आदराने नाव घेतात.
साधा, सरळ, सोज्वळ स्वभाव. शासनसेवेत उच्च पदावर राहूनही “ग” ची बाधा नसलेले संयमी, शांत, हसतमुख व्यक्तीमत्वाचे धनी म्हणजे सुधाकरभाऊ. लहानांमध्ये लहानासारखे, मोठ्यांमध्ये मोठ्याप्रमाणे राहणारे, गंमतीजंमतींना मनसोक्त दाद देणारे सुधाकरभाऊ.
मुळचे यवतमाळचेच परंतु शासनसेवेनिमित्त महाराष्ट्रभर फिरले. पुढे सेवानिवृत्तीनंतर यवतमाळला आल्यानंतर भावसार समाजाच्या विविध कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहायचे व त्यांची उपस्थित प्रकर्षाने जाणवायची. आजही भेट झाली की तितकेच उत्साही असतात.
विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखन केलेले आहे. विशेषतः भाऊ वर्धेला जिल्हा माहिती अधिकारी असतांना सेवाग्राम व पवनार (त्यावेळी आचार्य विनोबा भावे हयात होते) येथे संपूर्ण भारतातून व विदेशातून सुद्धा राजकीय, सामाजिक क्षेत्रात अत्यंत अत्युच्च पदावर असलेल्या व्यक्ती यायच्या. त्या सर्वांच्या संपर्कात येण्याचे भाग्य भाऊंना लाभलेले आहे.
त्या आठवणींसंबंधी भाऊंचे लिखाण व कथन अत्यंत वाचनीय व श्रवणीय आहे. आदरणीय भाऊंना पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे हस्ते 1982 मधे Priminister Best Administration Award सुद्धा मिळाला आहे. भाऊंच्या तोंडून तत्कालीन गंमतीशीर व मनोरंजक किस्से ऐकतांना खूप मजा तर येतेच पण सोबतच त्यांच्या दांडग्या स्मरणशक्तीची प्रचिती सुद्धा येते.
भाऊंचा मोठा मुलगा राजेश विद्युत अभियंता यवतमाळ येथेच विद्युत अभियंता आहे.तर लहान मुलगा संदीप पुणे येथे
एल आय सी त वरिष्ठ शाखा व्यवस्थापक आहे. भाऊंचा मोठा नातू कपिल न्यूयॉर्क येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून लहान नातू ओम फुटबॉल चा राष्ट्रीय खेळाडू आहे.सध्यात् याचे वास्तव्य कोलकाता येथे आहे.
भाऊंना त्यांच्या कुटुंबियांसमवेत निरामय दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
भाऊंचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो ही प्रार्थना.भाऊ, “आप जियो हजारो साल सालके दिन हो पचास हजार.”
— लेखन : अरुण सरागे
सचिव, महाराष्ट्र कनिष्ठ अभियंता संघटना
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
श्री धारवसाहेब यांचे मला नागपूर अमरावती येथे मार्गदर्शन लाभले आहे. तेव्हा मी तेथे विद्युत मंडळी त प्रसिद्धी अधिकारी होतो. त्यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार आणि शुभेच्छा. 🙏श्री सरागेसर यांचा परिचयपर लेख छान आहे. त्यांना धन्यवाद
अगदी खरोखर अतिशय साधे सरळ सोज्वळ आदरणीय व्यक्तीमत्व! ८५ व्या वर्षी पदार्पण होत आहे. यानिमित्ताने अभिष्टचिन्तनं! जीवेत शरद: शतम!