Monday, February 16, 2026
Homeसाहित्यभाऊबीज

भाऊबीज

दीपावली सण मोठा
तिथी कार्तिक बीज
नाहीच आनंदा तोटा
पवित्र ती भाऊबीज

चंद्रकोर नभी छान
यमासाठी दीपदान
मागितसे देवापाशी
भावासाठी आयुर्मान

माहेराची येई आठवण
बहिणीची वेडी माया
डोळे त्याच्या वाटेकडे
ध्यानी स्वप्नी बंधुराया

बहिणीच्या घरी भाऊ
करी औक्षण बहिण
छान भेट देई तिजला
सुग्रास अन्न करी ग्रहण

मनी करी कामना ती
भरभराटीची त्याच्या
तोही जागे कर्तव्याला
उभा सदा पाठी तिच्या

नाते भावा बहिणीचे
अतूट धागे स्नेहाचे
पवित्र बंधन प्रीतीचे
एकमेका जपायाचे.

— रचना : डॉ.सौ.अनुपमा पाटील. ठाणे
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खूप सुंदर बहीण भावाचे प्रेम….सर्वांनाच नाही लाभतं पण वाचून खुप् छान वाटलं !!!! अभिनंदन अनुपमा ताई !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11