भाग्यवान तुम्ही लेकरं हो
मुठीत तुमच्या जग आहे
जग आमचे रांगेत होते
रांगेतच आमचे आयुष्य होते
राशन साठी रांग होती
साखर राकेल साठी रांग होती
गॅस सिलेंडर नंतर रांगेत आले
वीज बिल ही रांगेत आले
टेलिफोनलाही नंबर होते
त्याचे बिलही रांगेत होते
बोलण्यासाठी रांग होती
रांगेत दिवस संपायचा
भाग्यवान आहेत लेकरं हो
मुठीत तुमच्या जग आहे
घरात बसुन तुम्ही
रांगेतली कामे संपून टाकतात
बोटाच्या तालावर तुम्ही जग फिरतात
जग मुठीत आलं आणि रांग संपली
रांग अशी विरळ झाली
विरळ झालेल्या धुक्यासारखी
धुक्यात शोधतो आहे
रांगेतली माणुसकी
रांगेतील माणुसकी

– रचना : विलास कट्यारे.