पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांच्या ‘भावगंधित व्यक्तिमत्वे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोलापूरचे साहित्यप्रेमी पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार, मनोरमा को. ऑ. बँकेचे अध्यक्ष श्री श्रीकांत मोरे यांच्या शुभहस्ते नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक श्री श्रीकांत मोरे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंग रजपूत उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. शिवाजी शिंदे म्हणाले, या पुस्तकात २९ व्यक्तींचे जीवन कार्य दिले आहे. समाजात काम करणाऱ्या काही व्यक्तींना उजेडात आणण्याचे काम या पुस्तकामुळे होईल, अशी आशा आहे. यामध्ये सदाशिव रामचंद्र मोरे (दाजी) यांचाही समावेश असून दाजी म्हणजे शब्दांच्या पलीकडचे आहेत. त्यांचे कार्य आणि विचार आपण असेच पुढे नेऊ या असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. राजशेखर शिंदे म्हणाले, या पुस्तकात समाजकारण, राजकारण, उद्योग, आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असून पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे.

लेखकाने प्रत्येक चरित्र नायकाचे आयुष्य समर्पक भाषेतून उलगडले आहे. काही माणसे आयुष्यभर इतरांच्या प्रगतीचा विचार करतात. त्यातीलच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे मनोरमा बँकेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव रामचंद्र मोरे (दाजी). हे त्यांच्या कार्याच्या रुपाने ते आपल्या सतत स्मरणात राहतील.
पल्लवी पवार यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद मोरे यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
