Thursday, January 30, 2025
Homeसाहित्यभावलेलं स्नेहमिलन

भावलेलं स्नेहमिलन

एम टी एन एल मधून नवी मुंबई परिसरातील स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या आणि काही निवृत्त झालेल्या, जवळपास १३० महिलांच अनोखं स्नेहमिलन नुकतंच सानपाडा येथे संपन्न झाले.

या स्नेह मिलन कार्यक्रमाविषयी खूप भावपूर्ण प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्या पुढे देत आहे.

छेडील्या तारा स्नेहाच्या

आले जुळूनी सूर मिलनाचे,
छेडिल्या तारा मनातील गुपितांच्या ॥
बरसुनी वर्षा स्वागत संख्यांचे,
चिंब भिजली मने स्नेहमिलनात ॥

अगदी असाच भारावलेला देखावा उमटला होता.
३० जून २०२२ रोजी ती आल्हाददायक संध्याकाळ ! मुसळधार पावसाच्या आगमनाने, वातावरण ऊबदार झाले होते. थंडगार वार्‍यासोबत, गार तुषार मनाला स्पर्शून जात होते. आम्ही एकशे तीस सख्या, मिलेनियम टॉवर्स शॉपिंग कॉम्प्लेक्स हॉलमध्ये, निसर्गाच्या रम्य वातावरणात, स्नेहमिलनाच्या सोहळ्यात, जवळ जवळ दोन वर्षांनी, एकमेकींना भेटण्याचा आनंद लुटत होतो. निसर्गाची मोकळी हवा, आमच्या मनालाही मोकळे करत होती.

स्नेहसंमेलनाची संयोजक न्यूजस्टोरीटुडे या वेबपोर्टल ची सहसंपादक, सौ.अलका भुजबळ हिने आखलेला हा मिलनाचा आराखडा, वाखाणण्याजोगा ठरला. तिच्या कल्पनेतून विविध कार्यक्रमाच्या रूपरेषा साकारण्यास, उत्स्फूर्तपणे पुढे सरसावली ती संयोजक समिती म्हणजे वर्षा पानसरे, गीता बोरकर, वृंदा पाटील, मृणाल जुमलेदार, मानसी लाड, शुभा रेवाळे व वर्षा भाबल, हया सर्वांचे खूप कौतुक व अभिनंदन !

गणेश वंदना व स्वागत गीत सादर करून, कोरोना काळात आमच्यासोबत काम करणारे कलिग, काही सख्या, कोरोना काळात आमच्यातून दूर गेल्या, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमात अध्यक्ष स्थानाचा लवलेश नसलेला एक आगळावेगळा, फक्त सख्यांनी सर्व सख्यांसाठी आखलेले हे स्नेहमिलन होय.

सर्वांसमोर लावलेले ते, स्नेहसंमेलनाचे उद्बोधक बॅनर, म्हणजे मैत्रिणींनी हातात हात धरून, कपातून वाफाळलेल्या चहाचा घोट घेत, नटूनथटून आलेल्या आम्ही जणू मैत्रिणी ! असे सुचवत होते. असे सुंदर स्नेहसंमेलनाचे स्पष्टीकरण, अलकाने मांडले.

सीजीएचएसचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस सुधाकर यांनी ‘सीजीएचएसचे फायदे’ हया विषयी माहिती दिली. उपस्थित सख्यांच्या मनातील शंकांचे निरसन त्यांनी केले. सकारात्मक भावना व विचार असलेल्या माणसात, आपण गुंतून राहिलो तर, माणूस नेहमी निरोगी राहतो. असा मोलाचा संदेश त्यांनी सर्वांना दिला. सर्वांच्या मनात सकारात्मक ऊर्जा नक्कीच निर्माण झाली असावी. त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार केला.

मृणाल बागायतकर, सुरेखा धटावकर व रेखा जोशी यांनी ‘मोबाईल’ विषयावर आधारित आधुनिक भारुड सादर केले. मोबाईल काळाची गरज असली तरी त्याची मर्यादा किती असावी, ह्याची जाणीव भारूडातून मिळाली. काहींनी गाणी गाऊन मस्त मनोरंजन केले. तर काहींनी, स्नेहमिलनाचा उद्देश काय असतो ? हयावर आपले मनोगत व्यक्त केले. कुणी कविता ऐकवल्या. साऱ्याजणी मनोरंजनात रमून गेल्या. काही खेळांचे आयोजन करून, स्वतःमधील स्पर्धक भावना जागृत केल्या. काही प्रश्नमंजुषा विचारून, अगदी हलकाफुलका असा खेळ रंगला. वेशभूषा स्पर्धा साधून, घेरदार परकर व त्यावर शॉर्ट कुर्ती परिधान केलेली, आमची सखी सायली सावंत बक्षीस पटकावून गेली.

एमटीएनएलमधून स्वेच्छानिवृत्ती नंतर, मिळालेला रिकामा वेळ काहींनी आपले छंद जोपासण्यास मार्गी लावला आहे. अशा मैत्रिणींच्या कलागुणांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये रॉबिनहूड आर्मी एनजीओ तर्फे, कॅन्सरग्रस्त मुलांसाठी व गरीब मुलांना जेवणाचे वाटप वृद्धाश्रमात जाऊन, मदत करणाऱ्या म्हणजे दमयंती शर्मा !
लायन्स क्लब तर्फे सामाजिक कार्य तसेच स्वतः युट्युबवर भक्तीगीत आणि रामायण- महाभारताचे सार सांगणाऱ्या, विजयालक्ष्मी बंडा !
सतत उद्द्बोधक लेख लिहून, फेसबुकवर टाकत, विचार करण्यास लावणारी, मानसी लाड !
कविता करणे, लेख लिहिणे, तर आत्मचरित्रपर आतापर्यंत चोवीस लेख लिहून, ते न्यूज स्टोरी टुडेवर प्रसिद्ध करणाऱ्या, वर्षा भाबल !
ऑनलाइन ऑफलाइन योगा शिकवणाऱ्या विलासिनी बडे !
लेखन व विविध कार्यात हिरहीरिने सहभागी होणाऱ्या तसेच न्यूजस्टोरीटुडे च्या सहसंपादिका अलका भुजबळ,
हया सर्व सख्यांना सन्मानाने गौरविण्यात आले. हयावेळी अलकाने, सर्व सख्यांना उद्देशून, ‘तुम्हीही आता काहीतरी छंद जोपासा.’ , तसेच ‘समाजासाठी काम करताना मिळणार आत्मसुख आपणास ऊर्जा मिळते‘ असा सुंदर संदेश दिला. मी सुद्धा माझ्या कवितेतून, आपल्या विश्वाचे रूप साकारले व सर्वांना संबोधित केले, ती माझी कविता

आपले विश्व
आगळ्या वेगळ्या विश्वात भेटलो,
नवरत्न महासागरी अभिमानाने जगलो,
ताठर कणा नजरेत बाणा,
मधुर वाणीने विश्व जिंकलो

नटणे सजणे श्वास आपला,
पिकनिक मेजवानी छंद केला,
व्यवहारी मात्र समतोल राखला,
सोन्यापरि संसार फुलविला

दुःख असो मनोव्यथा असो,
हृदयी सारे लपवित जगलो,
लहान असो मोठा असो,
सर्वांना साथ देत आलो

कष्टाच्या मार्गात फुले वेचताना,
सर्वांच्या सुखात स्वतः हरवलो,
केसात बट पांढरी होताना,
साठीच्या उंबरठयावर पोहचलो

काळ बदलला नियम बदलले,
काळासोबत स्वता:स घडविले,
कर्ज डोहात नवरत्न बुडाले,
वादळी भोवऱ्यात सारे विखुरले

निकामी आयुष्य पदरी आले,
अवखळ जीणे स्तब्ध झाले,
घुसमटत जगणे अवघड झाले,
भेटण्याचे निमित्त शोधू लागले

उमेदीचा कवडसा भरला मनात,
स्वतः स गुंतविले नव्या छंदात,
न थांबता केली सुरुवात,
भेटल्या सख्या आज स्नेहमिलनात

उजाडली आयुष्याची नवी पहाट,
न थांबता न घाबरता,
नवे जीवन नवे विश्व,
जगू आयुष्याचा नवा थाट

सेल्फी काढून आजच्या आठवणी मोबाईलच्या मेमरीत भरून घेतल्या. सर्वांनी चहा स्टार्टर व कलिंगड ज्यूसचा मनसोक्त आस्वाद घेतला. रात्री आठ वाजता एकत्र बसून जेवण केले. सोबत आईस्क्रीमची मजा घेतली. जणू त्यावेळी ऑफिसचा फील आला होता. २०२२ च्या स्नेहमिलनाची गोड आठवण म्हणून, सर्वांना स्नेहमिलन चित्रित कप भेट मिळाली.

एकमेकींचे हातात हात घेत तर गळाभेट करत, आजच्या मिलनाने, मिळालेली नवी ऊर्जा, नवी प्रबळ इच्छा, नवी उमेद व नवीन प्रेरणा गाठीशी बांधून, पुन्हा पुढच्या वर्षी जानेवारी २०२३ मध्ये असाच आनंदी जल्लोष करू. असे आश्वासन घेताना, प्रत्येकीचा चेहरा तेजाने चमकत होता. लख्ख नव्या उमेदीच्या वचनात, स्नेहमिलन सोहळ्याची सांगता केली.
– लेखन : सौ. वर्षा भाबल.

Sarva program chan arrengement khup chan thanks all commeette members for wonderful programme.
– हीना निलकनी

गिफ्ट is unique. Thanks for everything 💕💕 – तारा पिल्ले

स्नेहमिलन कार्यक्रम खूप छान झाला.आम्ही खूप एन्जॉय केलं.अलका आणि टीम ला खूप खूप धन्यवाद .सगळ्या मैत्रिणी ना भेटून खूप आनंद झाला. 👍👍  – संगीता

Well organised programme.thanks to all organisers so that we could meet all our friends after so many years. – पद्मा शेनॉय.

अलका आणि टीमचे खूप खूप धन्यवाद. असा सुरेख कार्यक्रम केला. आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केले. सर्व मैत्रीणीना भेटून तर फारच आनंद झाला. पुन्हा एकदा धन्यवाद 🙏 –

Thanks for such a wonderful gathering of all friends Nice food Everything is appericated Hats off to all those who planned it so nicely – दमयंती शर्मा

👍👍👍खुप खुप सुंदर कार्यक्रम सुंदर आखणी अलका व सर्व मैत्रिणींना धन्यवाद….रेखा जोशीं

Nicely Planned and very innovative 💡 program Alka and whole team congratulations 🎊 👏 💐 and thank you very much once again for this memorable program and food 🍹🙏- विलसिनी बडे

कार्यक्रम खूप छान झाला अलका आणि टीम चे खूप खूप आभार सर्व मैत्रिणीना भेटून जो आनंद झाला तो
शब्दात सांगू शकत नाही👌👍🙏- रश्मी मोहिते

स्नेहमिलनाची कल्पना ज्याना सुचली, त्यांचे अभिनंदन. अतिशय चांगले नियोजन, पुन्हा ऑफिसमध्ये working असल्याचा भास झाला.
सर्वाना भेटून आनंद झाला.
आईस्क्रीम खूप छान होते. – विजयमाला

Thanks to whole team for making such a beautiful programme. Very happy to meet all friends after such a long time. Thanks everyone for coming and giving their precious time to friends. – रितू तालरेजा

स्नेहमिलन कार्यक्रम खूपच छान झाला, जेवण पण छान होते, गिफ्ट पण एकदम भारी सर्व मैत्रीणीना भेटून आनंद झाला हे सर्व घडवून आणल्या बद्दल सर्व टीमचे खुप खुप धन्यवाद ❤️🙏👍 – पदमजा दळवी

अलका आणि सर्व टीम चे खुप मनापासुन धन्यवाद. स्नेहमिलन कार्यक्रम अतिशय सुरेख पणे आयोजित केला होता. खुप छान गिफ्ट. Thank you so much to all😊 – शीतल महेंद्रकर

स्नेहमिलन कार्यक्रम खूपच छान झाला. सर्व मैत्रीणीना भेटून खूप खूप छान वाटले. अलका, वर्षा, शुभा आणि टीम ला धन्यवाद. – वंदना म्हात्रे

A memorable, enjoyable evening today, meeting our friends.a dream came true. A big thanks to sneh milan grp admins and other volunteers who had initiated this programme gave pleasant opportunity to meet n milan with our friends. ambience, food arrangements everything was sooperb.wishing all our friends stay connected and stay blessed with healthy active joyful life always 👍👍– मीना कुमारी

Alka & grup khup khup Abhinandan. Tumhi khup Chan program Ayojit krun to purnhi kelat 👌mast. chan vatle. sglya skhya bhetlya. khup khup Dhanyavad. – विमल घोरपडे

Thank u so much Alka for organising such a beautiful get together. After a long we could see such a colourful beauties💐 THANK YOU FOR YOUR recognition its was pleasent surprise for me. Happy to memorise those happy days again. Thank you for every thing❤❤❤❤❤ – विजया लक्ष्मी

स्नेहमिलन अतिशय सुंदर झाले…….. सर्व टीमला धन्यवाद ❤️💞💞💖💖👌 मस्त आयोजन 💖💖💞💞जेवण 🤤🤤🤤🤤🤤आईस्क्रीम 🍧🍧🍧🍧👌💓💓❤️❤️💖💖💓💓- जयश्री नायर

Alka the great programe entertainment, games, instant question, laughing games everything was very funny every one enjoy it.
I was one who worried how u r going to manage with such a huge crowd but everything thing went smoothly. All had attended only 3 to 4 persons were absent.
And the CGhS Dr visited nd cleared all our doubts. Tks to Alka for arranging such arrangements.
Proud of u Alka
U great. Babal, Pansare were with u all the time.
Nd specially Tks to committee members for collecting money.
Programe went successfull.
Tks to special Alka nd the team members.
Very glad that Smitha also attended for short period.
Love u all my frds. we met together at this occasion nd made the function the best.
👏👏👏👏👍. लक्ष्मी

Thank you Alka and team for arranging this program….everything was done perfectly and thank you once again for the lovely gift…😊🥳💐🤝 – आशा

खुप छान कार्यक्रम झाला, स्नेहमिलन अतिशय सुंदर, सर्व सख्या भेटल्या अतिशय आनंद झाला.😍🥰❤️❤️👌👌👍-
अलका, वर्षा व सर्व टिमला मनापासून धन्यवाद💐💐👍👍🙏-  रक्षिता

वर्षा सुंदर कल्पना दिल्याबद्दल मनापासून आभार,
आणि तुझी कल्पना अमलात आणली त्या अलका आणि सख्यांना (टिमला) मनापासून धन्यवाद. – देशपांडे

स्नेहमिलन कार्यक्रम खूप छान झाला.
रिटायरमेंट नंतर सगळ्या मैत्रिणी पहिल्यांदा भेटल्या खूप खूप आनंद झाला याचे सर्व श्रेय अलका, शुभांगी, वर्षा आणि सगळी टीम यांचे आहे सगळ्यांना मनापासून धन्यवाद 💐💐💐👍👍🙏🏼🙏🏼- सुनंदा

Nice arrangements thanks to all members of teams and all friends those are came and thanku for a lovely gift but next year not on June keep in may not in rainy season pl. – प्रिती शर्मा

स्नेहमिलन खुप छान झाले बऱ्याच मैत्रिणी खुप वर्षांनी भेटलो खुप छान छान वाटले अल्का आणि तिच्या सगळ्या team la खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏 – जयश्री नाफडे

Varsha Alka shubha Ani Baki maitrinina manpurvak dhanyavaad kaaryakramache niyojan atishay sunder sarvana bhetun anand jala snehmilan manas khup khup bhavla🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽-  स्मिता पवार

SNEH MILAN such a beautiful name and it was truly a SNEH MILAN everyone was so happy meeting there friends and Madams Each and every thing was so beautifully done like Alka told about banner Poetry Songs Games Nice food Gifts everything was so nicely arranged Hats of to the committee and whoever took part in making this SNEH MILAN successful. – दमयंती शर्मा

all ladies are still in yesterday’s snehmilan hangover, can make out from their photo uploads with so much enthusiasm, nice to see apna apna grp displays 👏👏👌👌– मीना कुमारी

🙏🏻🙏🏻👌👌👍💜💜zakas programme zala alka ani allteam members la dhanyavad asech karyakram monthly arrange Kara full energy milali ata picnic arrange Kara sarvana once again thank u so much love u all. – अनुजा फणसेकर

Special thanks to Alka. A true team leader 🥇🥇🥇It was nat so easy to reach everyone after such a long break of time. But you and your team Surekha, Shubhada, Geeta, Varsha bhabhal, Varsha pansare, Laxmi, Vanita, Shubhangi rewale, Mansi, and last but not the least my favorite Rekha Joshi madam and Jaya Revankar made it possible. Thanks to each one of you well done Girls👌👌👏👏👏👏keep it up. Alka you and your deserve a bow from all of us. 👍👍👍👍❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏- स्मिता लोखंडे

अगं हेच इतकं तुम्ही नजर लागण्या इतपत सुरेख केलं तर पुढचे स्नेसमिलन नावा प्रमाणेच खास असणार.
अलका एकता में ही विविधता हैं हे कालच्या स्नहमिलनने करून दाखवलं.
तुम्हा सगळ्यांना त्रिवार धन्यवाद.
हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती असा झाला.
धडाकेबाज कार्यक्रम झाला.
पुढच्या वर्षी ज्या आपल्या सख्ख्या काही कारणास्तव येऊ नाही शकल्या त्या येतील आणि मजा घेतील. – देशपांडे

THANX TO ALKA & TEAM FOR MEMORABLE PROGRAMME
DECORATION & BANNER OF SNEH Sammelan (ALKA TOLD ABOUT BANNER DETAIL)/CGHS PROGRAMME/FOOD/ICE CREAM /GAMES/ GANPATI PRAYER OVERALL ALL WERE GOOD & WE ENJOY RAIN ALSO. – हिरानंदानी

सौ.अलका आणि तुझ्या स्नेह मिलन सोहळ्यातील आठ सख्या चे खूप खूप अभिनंदन. सोहळा सप्तरंगात साजरा झाला. खूपच छान.💐💐💐💐💐💐💐 – शैला राणे

वर्षामुळे हिरवळ पसरली सर्व जगतात.
अलकनंदा फुलांचा वास दरवळे असंमतात.
मनांची जुळली नाती सख्यांनो एकत्र येण्यत.
सर्व शुभ जाहले त्या स्नेहमिलनात.
हे भगवंत ! सर्व सख्यांनी एकजुट होणे होते तुझ्या मनात.
म्हणूनच हा योग जुळून आला स्नेहमिलनात.
स्नेहमिलनात, स्नेहमिलनात.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 – रक्षिता

स्नेहमिलन हा एक आनंदाचा क्षण होता, ज्या क्षणानी आमचे तन मन प्रफुल्लित झाले एक नवीन ऊर्जा मिळाली. अलका, वर्षा, शुभा व सर्व टिमचे, तसेच सर्व सख्यांचे आभार 🙏🙏🌹🌹🌹- रक्षिता

स्नेहमिलन टीमचे आपण सर्वांनी भरभरून कौतुक केलेत. हया दिवसाचे सार्थक घडले. केलेल्या कामाची योग्य पावती आमच्या टीमला मिळाली. खूप समाधान वाटले. पुनःश्च आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏
‘अनोखं स्नेहमिलन‘ अलकाने लिहिलेला अगदी मोजक्या शब्दात पूर्ण संमेलनाचे उत्तम वर्णन, ती संध्याकाळ डोळ्यासमोर उभी राहीली. सुंदर लेखन !
धन्यवाद ! 🙏- वर्षा भाबल

आपले स्नेह मिलन एवढे सुंदर रित्या पार पडले आणि वृत्तपत्रातून आलेली बातमी आणि फोटो पाहून मन हरखून गेले. संपादक म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच थोड्या थोड्या काळाने एकमेकांना भेटत राहणे आणि प्रत्येकाच्या आनंदात सामील होणे यामुळे आपल्यालाच एक अनोखी ऊर्जा मिळत असते. खरेच यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन स्नेह मिलन अधिकाधिक रंगतदार कसे होईल यासाठी एकमेकांना दुजोरा दिला पाहिजे. ❤️❤️❤️❤️❤️❤️ – मानसी लाड

Aaj prahar madhli aplya snehmilanchi batmi vachli ani khup abhiman vatla saglya chakoribahercha aayusha jagnarya mazy mitrinicha ani tya mala labhalya he maza ahobhaghya tumchy parissparshne jagnyach suvarna zal evdha matra khar khup khup manapasun sagyana dhanywad ashich prerana saglyana milat jagna soap hota yar asech bharbharun anand vatat rahu ani bhetat rahu.– जया रेवणकर

yesterday’s event ‘Sneh Milan’.. has brought a refreshing, reminiscences of our Navi Mumbai mtnl staff. a nice opportunity to bring everyone irrespective of everyone’s mindset in a common platform. kudos to Mrs Alka Bhujbal and her team members for hosting this event in a well organized manner within a short period. communicating about this event to friends with good network, with full cooperation and coordination.The arrangements in every aspect was awesome, like customized concept in displaying the banner, fixing a spacious hall to accommodate the maximum participants, ambience at the entrance and the stage. hosting multiple events like, singing, marati shayari, skit play, games etc.. etc. The chief guest invitee CGHS official was the highlight of this event and noteworthy who explained and cleared all unanswered doubts.The high Tea and the mouth watering dinner spread was inviting. All ladies were full of enthusiasm with hugs and cheer, smiles and laugh, meeting, greeting. every one was honored with a Thanksgiving customized memorable gift. proud of Navi Mumbai mtnl staff with unique identity. Feeling equally proud of sneh milan group organizers. looking forward to more and more such refreshing reunion gatherings
👏👏👏👏- मीना कुमारी

एक नं झाला कार्यक्रम👌👌👌👌रोज व्हाट्सअँप वर भेटणार्या मैत्रिणी ना आज प्रत्यक्ष भेटता आले. 30 ते 35 वर्षे एकत्र घालवल्यानंतर अचानक VRS आली आणि आपण सगळ्या दुरावलो. आज अलका आणि टिम ने आज एक असा दुवा साधला आणि आपण सगळे एकत्र आलो हसलो खेळलो खूप मज्जा केली. खरच आपण सगळ्या नी मागच्या जन्मी भरपूर पुण्य केले असणार म्हणून MTNL मध्ये नोकरी मिळाली. MTNL ने आपल्या ला खूप दिले भरभरून दिले आणि आपला श्वास असे पर्यंत देतच राहणार. आपण असे च दरवर्षी भेटत जाऊ असे म्हणतात की साठी नंतर आपण पुन्हा लहान होतो. लहान बाळा सारखे निरागस होतो. मनात कुठलाही राग लोभ असुया राहात नाही. तर आज या स्नेहमिलनाचा पहिल्या वर्षात पदार्पण झाले आहे आणि आपलेही तर चला आजपासून नवीन संकल्प करुया यापुढील सगळी वर्षे अशीच आनंदात आणि हर्षोऊल्हासात घालवु या. आतापर्यंतच सगळ आयुष्य घड्याळया च्या काट्यावर गेले . ९.52  ची ट्रेन 7.14 ची गाडी दगदग धावपळ कुटुंब मुलांच्या परीक्षा घर 🏡 ऑफिस हेच केले..,.. आत्ता थोडे स्वतःसाठी जगुया. स्वताचे छंद जोपासुया. आणि म्हणूया ‘काटोंसे खींच के ये आचल तोड के बांधी पायल कोई ना रोके दिल कि उडान को दिल वो चला आ हा हा…….’ ‘आज फिर जीने कि तम्मन्ना है…,. आज फिर जीने का इरादा है’. Thank you very much Alka and team💐😁😁😁😁👏👏👏👏👍👏though I came late I enjoyed 🙏🙏🙏❤️❤️❤️👍👍– स्मिता लोखंडे.

Tarikha 30/06/2022 hi visaru shakat nahi ek anokhe snhamilan ayojit kele hote total members 130 wa Alka Bhujbal madam it’s all good memories from start to end sarva niyojan purvak kele hote te keval tu Ani tu 💐Ani varsha pansare Ani all team members sarvana dhanyawad 🙏🏻💐keep it up alka sarva junya maitrini bhetlya ekandar kay tumhi kelelya parishrmache cheese zhale 👍sarva kahi sunder hote Ani tyatun tu kahinche kodkautuk keles kiti bare vatale sarvancha Anand pahun 😆Ani nightana ek sunder gift athawan 👍 it’s all nice memories Alka amhi kadhich visaru shakat nahi 🙏🏻 – स्नेहा सावंत

Well organised programme.Thanks to all organiser so that we could meet all our friends after so many years.

all ladies are still in yesterday’s snehmilan hangover, can make out from their photo uploads with so much enthusiasm, nice to see apna apna grp displays 👏👏👌👌– मीना कुमारी

Great👍🏻It was so good to meet friends after a very long time, though I missed some of them who could not make it. I hope it will be a much bigger event next year with a lot more friends joining in.😊- अमरीत धील्लोन

नवनवीन वृत्तपत्रातील बातमी पाहून रोजरोज मन नव्याने प्रफुल्लित होत आहे, खरे सांगायचे तर अजून 30 जूनच्या स्नेह मिलन कार्यक्रमातून आपण बाहेरच पडलो नाही आहोत. 💕💕परत परत अनुभवावासे वाटणारे ते क्षण वारंवार आपल्याला मैत्रिणींच्या गराड्यात नेऊन सोडत आहेत. 💕💕💕💕– मानसी लाड

या स्नेह मिलन कार्यक्रमाविषयी विविध वृत्तपत्रांनी देखील चांगली प्रसिध्दी दिली आहे.त्यापैकी काही कात्रणे पुढे देत आहे.

अलका भुजबळ

– संपादन : अलका भुजबळ.  9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments