महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे सुरु केली होती. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भिडेवाडा काव्य महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात नुकतेच या काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यासह गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ आदी राज्यातील दोनशेहुन अधिक कवी, कवयित्रींनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या काव्य महोत्सवात नेहमी प्रमाणे अध्यक्ष वा प्रमुख पाहुणे असे कोणी नव्हते. सगळेच साहित्यिक हेच प्रमुख आकर्षण ठरले. समान संधी देऊन साहित्याचा दर्जा जपला गेला. साहित्यिक क्षेत्रातील जगातले अनोखे दर्शन इथे पाहण्यास मिळाले. सर्व मान्यवर साहित्यकारांना “भिडेवाडा बोलला” या शीर्षकाने तिरंगी शेला, बॅच देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे श्रीमती सुगलाबाई, सौभाग्यवती रीना आणि कुमारी स्वरा वाडवेराव या एकाच घरातील तीन पिढ्यामधील स्त्री शक्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला. प्रास्ताविक आयोजक श्री विजय वडवेराव यांनी केले.
सर्व सहभागी कवी, कवियित्रीच्या कवितांमध्ये पहिली मुलींची शाळा भिडेवाडा, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, उस्मान शेख, वस्ताद लहुजी साळवे, पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे, यांच्या योगदानाचा उल्लेख होता. सर्व कविता भिडे वाड्याशी संबंधित असल्या तरी काव्य, गीत, गझल, अभंग, पोवाडा, पाळणा, धनगरी ओव्या अशा विविध प्रकारात रचना सादर झाल्या. या मुळे कार्यक्रमाला चार चाँद लागले.
समानता, जिद्द, चिकाटी जपत बा.ह मगदूम, स्वर्णा पवार, प्रतिमा काळे, अनिल नाटेकर, राहुल जाधव संविधानिक काम करणारे कार्यकर्ते दिवसभर झटत होते. या महोत्सवा दरम्यान सावित्रीबाई फुले यांचे नायगाव येथील वंशज दिलीप नेवसे तसेच पाच राज्यातील कवींचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व कवी कवयित्री यांच्या साक्षीने विजय वडवेराव यांना “भिडेवाडाकार” ही उपाधी बहाल करून पुष्प पगडी आणि उपरणे प्रदान करीत गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता काळे डॉक्टर तेजस्विनी कदम, मीनाक्षी जगताप, प्रतिमा काळे, एडवोकेट उमाकांत आदमाने सविता इंगळे यांनी केले.
सर्वश्री देवेंद्र गावडे, समाधान लोणकर, हेमंत जोशी, डॉक्टर मधुकर हजरे, अशोक मोहिते, कविता काळे, संतोष गाढवे, मधुकर गिलबिले, सुमित हजारे, शोभा जोशी, उर्मिला झगडे, सुवर्णा पवार, अनिसा सिकंदर, मनिषा पावले, प्रदीप गांधलीकर, सरिता कलढोने, आनंदा ढाले, अनिल नाटेकर, प्रतिभा काळे, राजेश थळेकर, सविता इंगळे, रानकवी जगदीश वनशिव, सावित्री गायकवाड, उमाकांत आदमाने आत्माराम हरी, योगीराज कोचाडे चंद्रकांत जोगदंड, करुणाकंद, महमुदा शेख डॉक्टर सुनिता धर्मराव, योगिता कोठेकर,अशा अनेक साहित्यकारांनी प्रखर शब्दात आपल्या कविता सादर केल्या.
कार्यक्रमाची सांगता करताना भिडेवाडाकार विजय वडवेराव यांनी जगभर असे काव्य सोहळे व्हावे अशी इच्छा प्रगट केली. प्रत्येक राज्यात पुढील काळात भिडेवाडा काव्य महोत्सव घेण्याचा त्यांनी संकल्प केला. हा काव्य महोत्सव त्यांनी स्वखर्चाने केला. एका दानशूर व्यक्तीने १२००० देणगी दिली असता विजय वडवेराव यांनी ती जाहीरपणे परत केली.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, कार्यकर्ते ही उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800