भ्रष्टाचार ही राष्ट्राला लागलेली कीड असून तिचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग व इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक सुनिता अविनाश नाशिककर केले. त्या भ्रष्टाचार प्रतिबंधक सप्ताहानिमित्त महाराष्ट्र बॅकेच्या नवी मुंबईतील वाशी परिक्षेत्राच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
श्रीमती नाशिककर पुढे म्हणाल्या की, प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपल्यापासून होते हे जाणून “मी लाच देणार नाही व मी लाच घेणार नाही” असा संकल्प प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. लाच घेण्याप्रमाणे लाच देणे हा देखील गुन्हा असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शासकीय स्तरावर टेक्नाॅलाॅजी चा वापर वाढल्यास भ्रष्टाचाराचे प्रमाण नक्कीच कमी होईल असा विश्वास व्यक्त करून त्यांनी सध्या सरकारी खात्यात ऑनलाईनचा वापर वाढत आहे पण तो प्रभावीपणे उपयोगात येत नाही, त्यामुळे तो वापर प्रभावीपणे होणे गरजेचे असून त्याच्यावर काऊंटर चेक ठेवून ऑनलाईन साईटच्या प्रभावी वापरासाठी त्या त्या विभाग प्रमुखांनी आढावा घेतला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी झोनल मॅनेजर अपर्णा जोगळेकर यांनी सांगितले कि, महाराष्ट्र बॅकेंत जर कोणी लाच मागत असेल तर त्याबाबत आपले नाव न सांगता अंतर्गत तक्रार करता येते व त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जाते. डेप्युटी झोनल मॅनेजर श्री सौरभ सिंग, यांनी देखील भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्याचे आव्हान केले.
या कार्यक्रमात, भ्रष्टाचार विरोधी, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतेच्या अखंडतेची बँक कर्मचारी, अधिकारी यांना प्रमुख अतिथी यांच्या कडून प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी नवी मुंबई झोन येथे स्टाफच्या पाल्यानी चित्रप्रदर्शनात भाग घेवुन, लाच प्रतिबंधक घोषवाक्य चित्रे काढली. उत्कृष्ट चित्राचा निकाल प्रमुख अतिथी जाहीर करण्यात आला. तसेच श्री प्रथमेश मलईकर यांनी ‘व्यक्तिगत मान्यता का भ्रष्टाचार’ या विषयावर आपला स्वलिखित लेख प्रकाशित केला.
सर्व स्टाफने या कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रसेनजीत अंकुश यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता, श्री जी. आर. सिंग यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
🙋♂️👍