“मंगलपुष्प” या सौ. प्रणाली म्हात्रे लिखित प्रथम पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच निरंकारी सत्संगा मध्ये श्री.विकास चौहान यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी श्री. मंगलदास ठाकूर, सौ. पुष्पलता ठाकूर, श्री. मंगेश म्हात्रे, श्री. सचिन पाटील, सौ. श्वेता पाटील, सौ. श्रुती विचारे, श्री. नितीन भोईर, श्री. महादेव म्हात्रे जिल्हा (मुखी), श्री. नरेंद्र पाटील (ज्ञानप्रचारक) यांची उपस्थिती होती. उपस्थित सर्व श्रेष्ठ सज्जनांनी सौ. प्रणाली म्हात्रे यांचे अभिनंदन केले.

सकारात्मक विचारांनी युक्त असणारे “मंगलपुष्प” हे पुस्तक रसिक वाचकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल यात शंका नाही.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800