Monday, February 16, 2026
Homeयशकथामंझील ची नवी मंझील !

मंझील ची नवी मंझील !

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा या सागरी तटावर नजर ठेवत भारताची सुरक्षा व्यवस्था चोख बजावण्याच्या कामगिरीसाठी श्री मंझील मधुसूदन आडे यांची ‘अचूक’ या जहाजाच्या कमांडंटपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे कार्यक्षेत्र 100 नॉटिकल सागरी क्षेत्र आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे.

अल्प परिचय
भारतीय माहिती सेवेतील निवृत्त अधिकारी मधुसूदन चरणदास आडे व सेवानिवृत्त शिक्षिका मधुलता आडे यांच्या तीन पुत्रांमधील मंझील हे ज्येष्ठ पुत्र आहेत.

भारतीय तटरक्षक दलाने 2009 मध्ये 68 अधिकाऱ्यांची निवड केली होती. त्यात महाराष्ट्रातून दोन अधिकाऱ्यांचा समावेश होतो. त्यातील एक म्हणजे मंझील आडे होत.

निवड झाल्यानंतर त्यांनी केरळ येथील एज़िमला येथील नौदल अकादमीमध्ये पाच महिन्यांचे कठोर प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सागरी क्षेत्रा अंतर्गत विविध शहरांमध्ये त्यांनी सेवा बजावली.

गेली पाच वर्ष ते मानखुर्द बेस मध्ये तैनातीवर होते.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ.☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. मंझील आडे यांच्या कार्यसेवेचा सुरेख आढावा.ही जबाबदारी देशाच्या संरक्षणविषयक विकासाला सहाय्यक ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11