Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यमकर संक्रांत

मकर संक्रांत

सण आला संक्रान्तीचा,
बोल मधुर बोलायाचा //

तीळ कणाकणाने फुलला
मधु स्नेहगंध दरवळला
प्रेमाने देऊं घेऊं
काटेरी हसरा हलवा //

काट्याने काटा काढा
जो मनी रुतुनिया बसला
रवि संक्रमित तो झाला
गगनात सोहळा सजला //

नववर्षी सुदिन हा आला
जन तयार संक्रमणाला
नवराजकारणी रमण्या,
स्थित्यंतर घडविण्याला //

स्नेहमधुर वाचे बोला
नीतीमत्ता ती जागवा
असिधाराव्रत तुम्ही घ्या ना
मानव्य धर्म तो माना //

सद् विवेक बुध्दी ठेवा,
लोकशाही तारायाला //

ते सोडून भेदाभेद
सत्तेचा सोडून लोभ
द्या मोहालाही छेद //

व्हा कार्य कराया सिध्द
ते स्थैर्य भारता देण्या,
यशमंदीर उभारायला //

स्वाती दामले

– रचना : स्वाती दामले. बदलापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments