महाराष्ट्र विधान सभेची निवडणूक येत्या २० नोव्हेंबर रोजी आहे.मतदारांनी या निवडणुकीत अधिकाधिक संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे,या दृष्टीने त्यांना आवाहन करणारी ही श्री ख र माळवे यांची कविता आज वाचू या.
अल्प परिचय
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उदापूर हे मूळ गाव असलेले श्री खंडू रघुनाथ माळवे उर्फ “ख र मा ” यांनी मोठ्या जिद्दीने शिक्षण घेतले.
पुढे रेल्वेत सेवा करून ते मुंबई सेंट्रल स्थानकाचे स्टेशन मास्तर म्हणून २०२० मध्ये सेवा निवृत्त झाले. सेवेत असताना आणि त्या नंतर ही ते साहित्यिक, साllमाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत.
त्यांची काही पुस्तके, चित्रपट प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
मतदान करा हो मतदान करा
दिनबंधू पाहून मतदान करा ||धृ||
गल्लोगल्ली रस्ते लाख
पायी चाल चिखल माख
या सभेला बोलत चोख
गरिबांची इमान राख
मतदारा करा हो मतदान करा ||१||
जनता कलीयुगा धरी
गरिब भाई पहा हेरी
जाहल्या चुका सुधार
व्हय बा मताधिकारी
जाती आहेत अठरापंधरा ||२||
राजकिय हातचलती
धाव धावतो पुढती
वर गुपचुप पहाती
गट आणि तट बोलती
दिन देहडा ठेवा र ठेवा पहारा ||३||
शेतकरी अन शहरी
ऐका माझे कारभारी
दिनरात कष्ट करी
ही भलीवाट झाली खरी
मंत्री झाले जरा विचार करा ||४||
सत्ताधिश तो कोट्याधिश
गावं आहे एकशेवीस
भांडवलदार मोठा
मग कसला हार तोटा
दिल्लीत पाठवा रे महाराष्ट्रा ||५||
गरिबाला गरिबच जानी
ऐकावी ती सत्यवाणी
घे तू जरा ध्यानीमनी
मतदारा राजा हो मतदान करा ||६||
— रचना : खं र माळवे. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मतदानासाठी मतदारांची जनजागृती उतम केली आहे.
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.