Wednesday, November 12, 2025

मतदार

मतदान करा, मतदान करा
जागरूक व्हा, जागरूक व्हा
प्रचाराचा…
नुसता ढोल नुसता ढोल

पण उमेदवार
आहेत तरी कोण ?
आहेत तरी कोण ?
बाप – बेटा, काका – पुतण्या
बाकी कार्यकर्ते
कागदाच्या फुकण्या
कागदाच्या फुकण्या

उमेदवाराचे
शिक्षण किती ?
शिक्षण किती ?
आठवी फेल, दहावी फेल
शिक्षणाचा
बट्ट्यागोल, बट्ट्यागोल.

उमेदवाराची
संपत्ती किती ?
संपत्ती किती ?
लाखो, करोडो
अब्जोपती, अब्जोपती
मतदार मात्र
रोडपती, रोडपती

उमेदवाराचे
काम कसे ? काम कसे ?
यांनी भरले
आपले खिसे, आपले खिसे
आश्वासनाचे..
नुसते फुगे, नुसते फुगे

मतदाराला
मिळणार ? मिळणार ?
निवडणूक आल्या
तिजोऱ्या उघडल्या
मिळणार त्यांना
एक एक आणा
एक एक आणा

निवडणूक झाल्यावर
मतदारांचे
काय झाले ? काय झाले ?
मतदान करुन
गोणपाट झाले
गोणपाट झाले.

— रचना : शितल अहेर. खोपोली, जि. रायगड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on कॅन्सर म्हणजे “कॉमा” !