Tuesday, July 1, 2025
Homeबातम्यामनमंथन संमेलन संपन्न

मनमंथन संमेलन संपन्न

मनमंथन लेखन वाचन समूह, नागपूर यांचे द्वितीय त्रिदिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन पुणे मुक्कामी कविवर्य राजा बढे साहित्य नगरी, शांतीवन गिरीवन रिसॉर्ट पानशेत पुणे येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी सभागृहात नुकतेच दिमाखात साजरे झाले.
निवृत्त आयकर अधिकारी आणि ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री बबनरावजी पोतदार हे संमेलनाध्यक्ष व महाराष्ट्र टाइम्स चे वार्ताहर आणि लेखक श्री भरतजी सुरसे व ज्येष्ठ लेखक आणि खेळाडू, नट श्री संजीवजी जाधव हे प्रमुख पाहुणे होते.

पहिल्या दिवशी राष्ट्रगीत व राजा बढे यांचे महाराष्ट्र गीत गाऊन वनवन्हीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. रात्र चढत होती आणि कार्यक्रमात रंगत भरल्या जात होती.

दुसऱ्या दिवशी ग्रंथदिंडी, ग्रंथ पूजन, ध्वजारोहण, दीप प्रज्वलन, मान्यवरांचा सत्कार आणि विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा सत्कार, यासोबतच मंडळाच्या “शब्द फुलांचे हिंदोळे” या स्मरणिकेचे आणि मंडळातर्फे प्रकाशित केलेल्या “सहाचे सहाच आणि गुहेचे रहस्य” या पुस्तकांचे व मंडळाचे सभासद सौ प्रेरणा वाडी यांच्या “सौदामिनी” या कथासंग्रहाचे सौ मंजुषा विश्वेकर यांच्या “शब्द ब्रह्म” या काव्यसंग्रहाचे व सौ साधना कपाळे यांच्या “इंद्रधनु” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन इत्यादी कार्यक्रम प्रथम सत्रात घेण्यात आले.

द्वितीय सत्रात कवयित्री कै. सौ चित्रा शर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ कवी कट्टा काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात ४० पेक्षा जास्त कविता सादर झाल्या.

तिसऱ्या सत्रात सायंप्रार्थना नंतर विविध कला दर्शन हा कार्यक्रम अतिशय उल्हासात साजरा झाला.

तिसऱ्या दिवशी सर्वांनी जल्लोष, नृत्य, गायन यांचा आनंद घेत संमेलनाची सांगता केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समूहाच्या अध्यक्षा सौ प्रेरणा प्रदीप वाडी, उपाध्यक्षा सौ वंदना पांडे, स्वागताध्यक्षा सौ शरण्या भिसे, संमेलन प्रमुख सौ मंजुषा विश्वेकर, सचिव सौ मिरा घोंगे, कोषाध्यक्ष श्री विनोद मुळे, निवास व्यवस्था प्रमुख सौ रूपाली साखरे सौ सुजाता दोरगे, भोजन व्यवस्था प्रमूख श्री संदीप कुलकर्णी व श्री चंद्रकांत तुंगार, वनवन्ही प्रमुख श्री सुनील कर्दळे, यासोबतच इतरही कार्यकारिणी चे सभासद आणि मंडळाचे सभासद यांनी अत्यंत उत्साहाने हातभार लावला.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खूप छान झालंय संमेलन.
    आणि संमेलनाची बातमी दिल्याबद्दल धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील