मनाची सुंदरता
रसनेला असे ठाव
वर्मावर घालू नये
कधी कुणा घाव
स्वर्ण रजत असो
धर्म जना शिकवी
उच्य रहाणी अन्
साधी विचारसरणी
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
घाव झेलता होतसे
चार लोकात प्रविण
अध्यात्माची कास
शिकवी जीवनात
सुख शांती समृद्धी
मंत्र ठेवा ध्यानात
बाह्य रुप निरखावे
गजवदन शिकवी
विद्वत्ता अंगी येण्या
संस्कार धुरा टिकवी
एकेक अवयव त्याचे
शिकवती संस्कृती
सुदृढता वृद्धींगत होते
अंतरंगी जना प्रकृती
भूतकाळ विसरता
भविष्य काळ निरख
दुरदृष्टी असेल संत
रुपात होईल पारख

– रचना : सौ शोभा कोठावदे