मी सांगते मनातील बात जगी नाही कुणी ही नाथ
जेव्हा येते दु:खाची रात पळतात सोडून सारे साथ
गुलाबाला काटे, मोहकता सारी
टोचत जाते सदाच आरी
कुणी केव्हा करेल घात
मी सांगते मनातली बात
आपले दु:ख आपुले फक्त
जगात सारे पैशांचे भक्त
झोपडीत ना दिवा,
खायलाही हवा,
तरी ही बसते लाथ..
कुणी दु:खात न देई साथ मी सांगते मनातील बात
कुणी न सुटले पिडेतूनी या
कुंती द्रौपदी माद्री
कुणी न दिली जगात या हो
शाश्वत सुखाची खात्री
सारे एका नावेत बसतात. मी सांगते मनातील बात
भिष्म ही गेले विदुर गेले
युधिष्ठिर नि कर्ण
शाश्वत नाही जगात याहो
सुख दु: ख नि पर्ण
कर्म जसे तसे भोगतात, मी सांगते मनातील बात
जेव्हा येते दु:खाची रात
तेव्हा सोडून सारे पळतात
मी सांगते मनातील बात
— रचना : प्रा.सौ. सुमती पवार. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800