Thursday, March 13, 2025
Homeसाहित्यमन भरून आले...

मन भरून आले…

नमस्कार, मंडळी.
माणुसकी सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी विविध माध्यमातून प्रसिद्ध झाल्यापासून व्यक्तिशः, दूरध्वनी करून व अनेक व्हाट्सएप ग्रुप्स वरून जेष्ठ, श्रेष्ठ स्नेही, मित्रमंडळी, पत्रकार, लेखक, वाचक मला शुभेच्छा देत आहेत.

आपण मला शुभेच्छा देऊन माझा आनंद द्विगुणित केलात. तसेच यामुळे अधिक काम करण्यासाठी माझा हुरूप वाढविलात, या बद्दल आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद 🙏

आज कुणाला कामाशिवाय भेटायला, बोलायला वेळ नसतो. मोबाईल वर टाईप करण्यातही वेळ जाऊ नये म्हणून खाणाखुणांची नवी भाषा (ईमोजी☺️ !) विकसित होत आहे.
अशा या परिस्थितीत आपण भरभरून व्यक्त केलेल्या भावनांमुळे माझं मन भरून आले आहे. आपला लोभ आहेच, तो पुढे अधिक वृद्धिंगत व्हावा, ही नम्र विनंती.🙏 पुढे काही निवडक शुभेच्छा देत आहे. धन्यवाद.
आपला,
– देवेंद्र भुजबळ. संपादक

योग्य, व्यक्तीला, योग्य, वेळी, मान, सन्मान, मिळाला, तरच, तो, मोठा, अभिमान, असतो, मनःपूर्वक शुभेच्छा
– विलास प्रधान. कामगार नेते, मुंबई

अभिनंदन भुजबळ साहेब.
आपण समाज भुषण आहात. आपले मनःपूर्वक अभिनंदन.
– प्रदीप बारस्कर आणि टिम कालिका देवी संस्थान टिटवी वाढोणा.

व्वा ! हार्दिक अभिनंदन 👏👏💐
माझ्या शुभेच्छा सदैव आहेत. केव्हढे मोठे कार्य करीत आहात! इतक्या लेखकांना उत्तेजन देणे, त्यांचे लिखाण संपादित करून प्रकाशित करणे…एक मोठेच व्रत आहे. खूप कौतुक आणि त्यात हा पुरस्कार ….माणुसकी सेवा …ग्रेट !
– नीला बर्वे. सिंगापूर

माणुसकीच्या माणसाला माणूसकीचा पुरस्कार ! गत दोन वर्षांपासून समाज माध्यमांवर स्वत:ची वेगळीच छाप टाकून सर्वांचे प्रेरणास्थान बनलेले, आदरणीय देवेन्द्रजी भुजबळ यांना, भारत सरकारकडे नोंदणीकृत असलेल्या माणूसकी फौंडेशनने, पुरस्कार जाहीर करुन माणुसकीचा प्रत्यय दिला आहे.भुजबळ सरांनी, दररोज शेयर होणाऱ्या न्युजटुडेच्या माध्यमातून हजारो मित्र जोडले आहेत. माणूसकी जपत, समाज प्रबोधन करणारे, खरीखुरी माणूसकी जपणारे भुजबळ सर हे सर्वांचेच प्रेरक बनले आहेत. त्यान्च्या माणूसकीच्या कार्याचे खरेखुरे परिक्षण माणूसकी जपणारे आहे. भुजबळ सरांचे आपण अभिनंदन करून पुढील कार्याला शुभेच्छा देऊ या. धन्यवाद …..
– माधव अटकोरे. जेष्ठ पत्रकार, नांदेड

आ. देवेंद्र भुजबळ यांना मिळालेल्या राज्य स्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्कारा बदल मनापासून अभिनंदन आणि पुढील काळासाठी उज्ज्वल शुभेच्छा.
– अशोक बोरकर. अहमदाबाद

मान. देवेंद्रजी भुजबळ साहेब,से.नि.संचालक,माहिती व जन संपर्क महाराष्ट्र… आपणांस प्राप्त झालेल्या “राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्कारा” बद्दल आपले मनःपुर्वक अभिनंदन. सेवा निवृत्तीनंतर ही आपले काम अखंडपणे चालू आहे.या पुरस्काराने जसा आपला गौरव झाला आहे तसाच आम्हा सानपाडा वासियांचाही गौरव झाला आहे असे वाटते. आपला आम्हांस अभिमान आहे.

मा. देवेंद्रजी भुजबळ साहेब आपणास महाराष्ट्र राज्य शासनाचा माणूसकी सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हे वाचून खूप आनंद झाला.
एका पात्र आणि प्रामाणिक पणाने माणूस व त्याचा मानवतावादी धर्म शिकवण्याचा मनोमन प्रयत्न करणाय्रा पात्र व्यक्तिमत्त्वाचा आपल्या रुपाने गौरव होत आहे… त्या बद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन !!!🌹
शुभेच्छुक, आपल्या विचारांचा पाईक…
– तानाजी अंकुशराव. चिंचवड

सन्माननीय श्री.देवेंद्रजी भुजबळ सर,
आपणास आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अभिमान वाटतोय व गर्वही होतोय. आम्हालाही आपले अमूल्य मार्गदर्शन लाभले आहे.

आपणास राज्यस्तरीय माणूसकी सेवा गौरव पुरस्कार समाजाप्रती दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मिळत आहे, हे वाचून खूप मनापासून आनंद झाला. आपले डिजीआयपीआर पेन्शनर्स ग्रुपच्या वतीने आणि माझ्याकडूनही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन व प्रेमपूर्वक शुभेच्छा💐
– विश्वनाथ मोरे. मुंबई

श्री देवेंद्र जी,एकामागोमाग एका पुरस्काराने आपल्या विविध कार्य,कामगिरी आणि सेवेचा गौरव होतांना निश्चितच आनंद,समाधान होत असते. आपले मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
सुधाकर तोरणे, निवृत्त माहिती संचालक, नाशिक.

भुजबळ सर, आपले मनापासून अभिनंदन ! आत्ताच बातमी वाचली. आपल्या महान कार्याचा फार छान आढावा घेतला आहे मदन लाठींनी. मी स्वतःला भाग्यवान समजते, की मी आपल्या संपर्कात आले, इतकंच काय पण चळवळीने आयोजित केलेल्या एका उपक्रमांत आपले मोलाचे योगदान लाभले, यांत संस्थेचाही गौरव आहे. आम्हा सर्वांकडून आपल्याला खूप शुभेच्छा, आपल्या यशात आपल्या सुविद्य पत्नींचा अलका ताईंचा सुध्दा वाटा आहेच, त्यांचेही मनापासून अभिनंदन. तसेच पुरस्कार समारंभासाठी खूप खूप शुभेच्छा.💐
आशा कुलकर्णी, सचिव, हुंडा विरोधी चळवळ
मुंबई

Congratulations.You really deserve it.One more feather in your Cap.Best wishes for future endeavors.
Chandrashekhar Oak, Retd.IAS

 

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. आदरणीय देवेन्द्रजी मन भरून आले या आपल्या सुंदर
    मनोगतात असलेल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया वाचून
    मन आनंदाने भारावून गेले.आजची सुरेखा ताईंची कविता तसेच कालचा श्री.मदन लाठी यांचा लेख आणि
    भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका लता गुंठे यांनी दोन दिवसांपूर्वीच पाठवलेलं तुमचं प्रेरणेचे प्रवासी हे पुस्तक
    सारा मणीकांचन योग जुळून आला
    आणि माझा आनंद गगनाला भिडला
    प्रेमपूर्वक अर्पितो आपणास अभिनंदनाची पुष्पमाला
    बहरत राहो सदैव जीवनी आपुल्या आनंदाचा मळा
    राजेंद्र वाणी
    दहिसर मुंबई 🙏🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shrikant Pattalwar on कविता
शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित