अष्टाक्षरी काव्य रचना
आले दाटूनी मन हे
जावे सागर किनारी
भाव मनीचे हलके
आठवात अश्रू सारी
सुख दुःख मनातील
वदू वाटतसे जेव्हा
जावे सरिते किनारी
माहेरात जाशी तेव्हा
सांग माऊली पित्यास
लेक आहे सुखी सांग
माय सरिता समान
फेडू वाटे मज पांग
परोपकारार्थ भाव
शिकवतो तो किनारा
लवणाचे जल त्यात
मधू नारळाचे सार
द्यावे जगासी संपदा
शंख शिंपले मासळी
उपकार मासळीत
पोट भरण्या या तळी

✒️सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
मानवी भावना व निसर्गातील प्रतिमांची योग्य सांगड
🌹अप्रतिम शब्द रचना, सागर, नदी, किनारा सर्व छान जुळून आले.
🌹माहेरची आठवण खूप सुंदर 🌹
धन्यवाद
सौं शोभा
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ