मधेच फसली
नाव माझी
नदीस येता पूर
मम गाव राहिले दूर ।।धृ।।
पैलतीरी मज जावे वाटे
मार्गामधी परि अनंत काटे
भरुनी येतसे ऊर
मम गाव राहिले दूर ।।१।।
प्रपंचाची मज आसक्ती
मी अन् माझे कुंठित अति मती
हरिनामाचा लागे ना सूर
मम गाव राहिले दूर ।।२।।
दर्शनाची आस मजला
भेटीलागी प्राण व्याकुळला
नको देवा थट्टा अशी क्रूर
मम गाव राहिले दूर ।।३।।
जाणतसे अशाश्वत सारे
कळते जरी तरी वळतचि ना रे
ज्योतीतही नुरला नूर
मम गाव राहिले दूर ।।४।।

— रचना : अरूणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ,
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Super
वाह सुंदर